लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारकडून मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टनिमित्त प्रथमच भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ७ सप्टेंबर या दिवशी जन्माष्टमी आहे. या दिवशी ३ किलोमीटर लांब शोभायात्रा असणार आहे. यात ५० लाख भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. सकाळी ८ वाजता श्रीकृष्ण जन्मस्थळाच्या प्रदक्षिणेला प्रारंभ होईल.
#ShriKrishnaJanmashtami पर #Mathura में पहली बार #ShobhaYatra निकाली जाएगी https://t.co/Qm3lmIk5A2
— Times Now Navbharat (@TNNavbharat) August 31, 2023
श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा ट्रस्टचे गोपेश्वर चतुर्वेदी म्हणाले की, शोभायात्रेसाठी जगभरातून फुले मागवली आहेत. मथुरेचे १२ मार्ग, १८ चौक आणि घाट सजवण्यात आले आहेत.