‘आध्यात्मिक उन्नती केली की, देहातून पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही पंचतत्त्वे प्रक्षेपित होऊ लागतात. यांतील तेजतत्त्वामुळे देहातून प्रकाश प्रक्षेपित होतांना दिसतो. समोर अंधार असतांना हात अंधाराच्या दिशेने केला की, हाताच्या बोटांतून प्रकाश बाहेर पडलेला दिसतो. या प्रकाशाच्या संदर्भात पुढील वैशिष्ट्य लक्षात आले.
विजेरीचा प्रकाश अंधाराच्या दिशेने सोडल्यास काही अंतरापर्यंत तो स्पष्ट दिसतो; पण अंतर वाढवत गेल्यास प्रकाश अस्पष्ट होत जातो. याउलट अध्यात्मातील उन्नतांच्या हाताच्या बोटांतून बाहेर पडणारा तेजतत्त्वरूपी प्रकाश जवळच्या अंधारापेक्षा दूरच्या अंधारात आणखी स्पष्ट दिसतो. याचे कारण म्हणजे अंतर वाढत गेल्यास हाताच्या बोटांतून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वाची गती आणि व्याप्ती वाढत जाते. त्यामुळे दिसणारा प्रकाशही आणखी स्पष्ट दिसू लागतो. हे आहे अध्यात्माचे वैशिष्ट्य !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.५.२०२३)