अभूतपूर्व ऐतिहासिक आणि यशस्वी ठरलेल्या ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या निमित्ताने…
२३ ऑगस्ट २०२३ या दिवशी ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ची (‘इस्रो’ची) अभूतपूर्व ऐतिहासिक ठरलेली ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाली. त्या वेळी मला ‘चार चांद लगा देना’, अशी हिंदीमध्ये असलेली एक म्हण आठवली. ही म्हण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरी करून दाखवली आहे. त्याचे विश्लेषण पुढीलप्रमाणे :
१. पहिला चंद्र : काँग्रेसने तिच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ सत्ताकाळात तिला जे करता आले नाही, ते कलम ३७० (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) केंद्रातील भाजपच्या सरकारने केवळ एका दिवसात हटवले.
२. दुसरा चंद्र : रामजन्मभूमीचा जो प्रश्न शेकडो वर्षे प्रलंबित होता आणि जो काँग्रेस सरकारला ६० वर्षांच्या सत्ताकाळात सोडवता आला नाही, तो केंद्र सरकारने केवळ ६ वर्षांत सोडवला.
३. तिसरा चंद्र : पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून अनुमाने ३०० जणांना ठार केले, तसेच गलवान खोर्यात चीनच्या अनुमाने ४० सैनिकांना घायाळ करून अद्दल घडवली.
४. चौथा चंद्र : ‘इस्रो’चे ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात पूर्णपणे यशस्वी होऊन त्या रूपाने प्रत्यक्ष चौथा चंद्र प्राप्त केला.
अशा प्रकारे ‘चार चांद लगा देना’, ही हिंदी म्हण भारताने नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सार्थ ठरवली आहे.
– श्री. दत्तात्रय पटवर्धन, कोलगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.