परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या प्रती कृतज्ञताभावात असणारे पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी !

नारळी पौर्णिमा (३०.८.२०२३) या दिवशी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता पू. सुरेश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त साधकाला पू. (अधिवक्‍ता) कुलकर्णीकाका यांच्‍यात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी जाणवलेल्‍या अपार कृतज्ञताभावाविषयीचे उदाहरण येथे पाहूया.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ

‘वर्ष २०२१ मध्‍ये मी सनातनचे ९८ वे संत पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी (वय ६३ वर्षे) यांना दीपावलीनिमित्त नमस्‍कार करण्‍यासाठी भ्रमणभाष वरून संपर्क केला होता. तेव्‍हा पू. काका माझ्‍याशी बोलतांना सहज म्‍हणाले, ‘‘रामनाथी आश्रमातून कोणत्‍याही वयोगटातील साधकाचा भ्रमणभाष आल्‍यावर मी त्‍या साधकाशी उभा राहून बोलतो. मला या संपर्काच्‍या माध्‍यमातून विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या निवासाने पावन झालेल्‍या वास्‍तूतील चैतन्‍य मिळते. तुम्‍हा साधकांच्‍या माध्‍यमातून मला हे चैतन्‍य मिळत असल्‍याने मी कृतज्ञता म्‍हणून उभा रहातो.’’

– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, फोंडा, गोवा. (२४.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक