‘फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत ?’, असा प्रश्‍न मुसलमान विद्यार्थ्यांना विचारणार्‍या शिक्षिकेला अटक !

नवी देहली – ‘फाळणीच्या वेळी तुम्ही पाकिस्तानात का गेला नाहीत?’ असा प्रश्‍न गांधीनगर येथील सर्वोदय बाल विद्यालय या सरकारी शाळेतील हेमा गुलाटी या शिक्षिकेने ४ मुसलमान विद्यार्थ्यांना विचारल्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. चारपैकी एका विद्यार्थ्याच्या पालकांनी याविषयी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

मुळात असा प्रश्‍न विचारण्यात आक्षेपार्ह काय आहे ? भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि तेव्हा ‘मुसलमानांना पाकिस्तान आणि हिंदूंसाठी भारत’, असे अधिकृतरित्या ठरवण्यात आले होते. नंतर गांधी आणि नेहरू यांनी केलेल्या आवाहनानंतर मुसलमान भारतात राहिले, हा इतिहास आहे. अशा राहिलेल्या मुसलमानांना कुणी प्रश्‍न विचारला, तर चुकीचे काय ?