अमेरिकेमध्ये ‘इस्लामोफोबिया’विषयी (इस्लामविषयी तिरस्कार) कायदा करण्यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही, म्हणून ‘हेट स्पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे. हिंदूंच्या विविध सभांमधून हिंदूंमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे जिहादी अस्थिर झाले आहेत. हिंदूंच्या सभांत बोलणारे वक्ते, आयोजक यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात आहे. जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त मी केलेल्या भाषणाला ‘हेट स्पीच’चा संदर्भ देऊन माझ्याविषयी तक्रार प्रविष्ट झाली. हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, राष्ट्रप्रेमी काजल हिंदुस्तानी यांना ‘हेट स्पीच’च्या नावाखाली अटक केली होती. या सर्व प्रकारांच्या विरोधात लढाई लढण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक आहे.