१. बहुगुणी स्वर
‘गायकाची आंतरिक शुद्धी असल्यास त्याने गायलेला प्रत्येक स्वर हा शुद्धच असतो. अशा स्वरांनी गायकाच्या मनाला स्थैर्यता प्राप्त होते आणि आनंदाची अनुभूती येते. गायकाने भान हरपून शुद्ध स्वर गायल्यास त्याची अन्न आणि पाणी यांची आवश्यकता काही काळ स्वरांद्वारे पूर्ण होते. त्यामुळे अशा गायकाला अनेक घंटे भूक आणि तहान लागत नाही. अशा वेळी शुद्धस्वर हेच त्याचे अन्न बनते आणि तो तृप्त होतो. अशा स्वरांना ‘बहुगुणी स्वर’, असे म्हणतात.
२. प्राणी आणि पक्षी यांचे ‘स्वरज्ञान’ !
काही प्राणी आणि पक्षी यांना ‘स्वरज्ञान’ असते. ते प्राणी आणि पक्षी यांचा आवाज ‘हा गायक लयबद्ध स्वर गातो’, अशा पद्धतीचा असतो, उदा. कोकिळा, मोर, हत्ती, बकरा, बेडूक इत्यादी.
२ अ. प्राणी आणि पक्षी यांना स्वरांमुळे होणारा लाभ : ‘स्वरज्ञान’ असेलेले प्राणी आणि पक्षी यांना काही वेळा खाद्य उपलब्ध नसते. त्या वेळी ते भुकेपोटी आवाज करतात. तेव्हा त्या आवाजातील लयबद्ध स्वरांचा परिणाम त्यांच्या शरिरावर होतो. त्यामुळे त्यांना स्वरांद्वारे अन्न आणि पाणी यांतून मिळणारी तृप्ती मिळते. त्यामुळे त्यांचा काही काळ अन्न आणि पाण्यावाचून सहजतेने निघून जातो. या ज्ञानाला ‘स्वरगुह्य’, असे म्हणतात. स्वरांमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. त्यांपैकी हे एक आहे.
३. गायकाला भगवंताशी जोडणारा एक मार्ग, म्हणजे दैवी स्वर होय.
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.