सनातनच्‍या ६९ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना श्री. रवि आणि सौ. राधा साळोखे यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी अतुल पवार यांना साळोखे दांपत्‍याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘श्री. रवि साळोखे यांच्‍या आईंच्‍या मेंदूच्‍या एका बाजूला फुगवटा निर्माण झाल्‍यामुळे त्‍यांचे शस्‍त्रकर्म झाले होते. आधुनिक वैद्यांनी श्री. रवि यांना सांगितले, ‘‘त्‍यांच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूलाही फुगवटा निर्माण झाला असून तो वाढू शकतो. त्‍यासाठी त्‍यांना काही काळ औषधोपचार घ्‍यावे लागतील.’’

१. ‘श्री. रवि यांच्‍या आईंच्‍या मेंदूत निर्माण झालेला फुगवटा किती प्रमाणात आहे ?’, हे पहाण्‍यासाठी त्‍यांची ‘अँजिओग्राफी’ चालू असतांना साळोखे दांपत्‍याने सेवा करणे

श्री. रवींद्र साळोखे

जानेवारी २०२३ मध्‍ये ‘श्री. रवि यांच्‍या आईंच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या भागात आलेला फुगवटा किती प्रमाणात आहे ?’, हे पहाण्‍यासाठी त्‍यांच्‍या मेंदूची मुंबई येथील ‘के.ई.एम.’ रुग्‍णालयात ‘अँजिओग्राफी’(हृदयाच्‍या रक्‍तवाहिन्‍यांची चाचणी) करण्‍यात आली. श्री. रवि आणि सौ. राधा यांनी आईंच्‍या समवेत रुग्‍णालयात जातांना ‘ऑनलाईन’ करता येण्‍यासारखी सेवा समवेत नेली होती. आईंची ‘अँजिओग्राफी’ चालू असतांना श्री. रवि आणि सौ. राधा यांनी रुग्‍णालयात ‘अँजिओग्राफी’ कक्षाच्‍या बाहेर बसून ती सेवा केली.

२. ताण न घेता आईंची ‘अँजिओग्राफी’ चालू असतांना सेवा करणारे साळोखे दांपत्‍य !

सामान्‍यतः स्‍वतःच्‍या आईची ‘अँजिओग्राफी’ चालू असतांना एखाद्याला आईच्‍या प्रकृतीविषयी ताण येऊ शकतो किंवा काळजी वाटते; पण या दोघांनी असा कुठलाही ताण न घेता आणि काळजी करण्‍यात वेळ न घालवता ‘अँजिओग्राफी’ कक्षाच्‍या बाहेर बसून रहाण्‍याच्‍या वेळेत सेवा केली.

सौ. राधा साळोखे

३. ‘वेळोवेळी झालेल्‍या सत्‍संगांमधून ‘उपलब्‍ध वेळेचा उपयोग सेवेसाठी करायला हवा’, ही जाणीव साळोखे दांपत्‍यामध्‍ये निर्माण होणे

याविषयी बोलतांना सौ. राधाताई साळेखे म्‍हणाल्‍या, ‘‘पूर्वी आम्‍हाला सेवेचे गांभीर्य वाटत नव्‍हते; पण वेळोवेळी झालेल्‍या सत्‍संगांमधून ‘आपली सेवा करण्‍यासाठीची तळमळ कशी असायला हवी ?’ अन् ‘आपण त्‍यात किती न्‍यून पडतो ?’, हे आमच्‍या लक्षात आले. सत्‍संगांमुळे ‘उपलब्‍ध वेळेचा उपयोग करून सेवा करायला हवी’, ही जाणीव आमच्‍यामध्‍ये निर्माण झाली. त्‍यासाठी आम्‍हाला कृतज्ञता वाटते.’’

श्री. रवि आणि सौ. राधा साळोखे यांच्‍या या कृतीतून ‘आपण अशा परिस्‍थितीतही सेवा करू शकतो’, हे मला शिकता आले आणि ‘सत्‍संगात सांगितलेल्‍या सूत्रांचा स्‍वतःच्‍या साधनेसाठी लाभ करून घेऊन स्‍वतःमध्‍ये कसे परिवर्तन करू शकतोे ?’, हेही माझ्‍या लक्षात आले.’

– (पू.) सौ. अश्‍विनी पवार, सनातन आश्रम, देवद (पनवेल) (१७.२.२०२३)