डोनाल्ड ट्रम्प यांंना अटक आणि सुटका

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – वर्ष २०२० मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालात हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना अटक करण्यात आली. ट्रम्प स्वतःहून पोलीस ठाण्यात उपस्थित झाले होते. पोलिसांनी ट्रम्प यांना अटक केल्यानंतर इतर गुन्हेगारांप्रमाणे त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले आणि छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर २ लाख डॉलरच्या (१ कोटी ६५ लाख ३१ सहस्र रुपयांच्या) जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली.

त्यानंतर ट्रम्प पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नसून ही न्यायाची फसवणूक आहे. अप्रामाणिक वाटत असलेल्या निवडणुकीला आव्हान देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.