६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. सायली देशपांडे हिला सुचलेली प्रार्थना !

‘१८.४.२०२३ या दिवशी झालेल्‍या दैवी बालसत्‍संगात कु. आपला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १६ वर्षे) हिने सर्व साधकांना प्रार्थनेचे महत्त्व सांगितले. त्‍यानंतर प्रायोगिक भाग म्‍हणून तिने सर्वांना प्रार्थना करण्‍यास सांगितले. तेव्‍हा गुरुमाऊलींनी हृदय पटलावर उमटवलेल्‍या शब्‍दांत झालेली प्रार्थना पुढे दिली आहे.

कु. सायली देशपांडे

प्रार्थना : ‘हे सच्‍चिदानंद परब्रह्म, म्‍हणजेच प्रत्‍येक जिवाला सत्, चित् आणि आनंद यांची अनुभूती देऊन पुढे परब्रह्माशी एकरूप करणारी, म्‍हणजेच मोक्ष प्रदान करणारी गुरुमाऊली ! मी तुम्‍हाला संपूर्णपणे शरण आले आहे. हे गुरुमाऊली, आता मला केवळ आणि केवळ तुमच्‍या चरणांजवळील धूलीकण बनायचे आहे. हा मानवी देह अहंयुक्‍त आहे. तुमच्‍या पुढे या देहाचे काहीही अस्‍तित्‍व नसतांनाही या देहाला त्‍याच्‍या असण्‍याचा मीपणा आणि अहं आहे. हे गुरुमाऊली, या दासाची एकच प्रार्थना आहे की, या अहंच्‍या जाळ्‍यातून मला मुक्‍त करून तव चरणांजवळील अहंविरहित धूलीकण बनता येऊ दे. या धूलीकणरूपी दासाची नित्‍य सेवा, म्‍हणजे तुमच्‍या चरणांचे नित्‍य निरीक्षण करून त्‍यांचे स्‍तुतीगान करणे असो. मला तुमच्‍या चरणांशी घ्‍या, हीच तुमच्‍या कोमल श्रीचरणी प्रार्थना आहे.’

‘हे गुरुमाऊली, तुमच्‍याच कृपेमुळे या प्रार्थनेतून मला शरणागत स्‍थिती अनुभवता आली. त्‍याबद्दल मी तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. सायली देशपांडे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १४ वर्षे) रामनाथी आश्रम गोवा. (३०.४.२०२३)