सुप्रसिद्ध तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी तबल्‍यावर वाजवलेला भजनी ठेका अन् सौ. अनघा जोशी यांनी केलेले गायन यांचे सूक्ष्म परीक्षण !

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक आणि ‘संगीत (तबला) अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे श्री. योगेश सोवनी यांनी तबल्‍यावर वाजवलेला भजनी ठेका अन् सौ. अनघा जोशी यांनी केलेले गायन यांचे सूक्ष्म परीक्षण !

‘२७.३.२०२१ या दिवशी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधिका सौ. अनघा जोशी,(बी.ए. संगीत, आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांनी ‘सुंदर ते ध्‍यान’ हा संत तुकारामांचा अभंग गायला आणि ‘जय जय रामकृष्‍ण हरि।’ या नामाचा गजर केला. तेव्‍हा त्‍यांना डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी तबल्‍यावर साथ देत भजनी ठेका वाजवला. तेव्‍हा देवाच्‍या कृपेने मला सूक्ष्म स्‍तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

श्री. योगेश सोवनी

१. सौ. अनघा जोशी यांनी केलेल्‍या गायनाचा सूक्ष्म स्‍तरावर झालेला परिणाम

१ अ. सौ. अनघा जोशी यांनी ‘सुंदर ते ध्‍यान’ हा संत तुकारामांचा अभंग गाणे : सौ. अनघा जोशी हा अभंग म्‍हणत असतांना आरंभी त्‍या थोड्या सतर्क असल्‍यामुळे अभंग सहजतेने म्‍हणू शकत नव्‍हत्‍या. काही क्षणांतच त्‍यांचे मन पूर्णपणे अभंगावर केंद्रित झाल्‍यावर त्‍यांनी तालासुरात अभंग गायला. हा अभंग ऐकत असतांना माझा श्री विठ्ठलाप्रतीचा आर्तभाव जागृत झाला. या अभंगात श्री विठ्ठलाच्‍या नयनमनोहारी रूपाचे वर्णन केले आहेे. त्‍यामुळे या गायनातून दिव्‍य शृंगाररस झळकत होता. हे गायन ऐकत असतांना मला श्री विठ्ठलाच्‍या सुंदर रूपाचे दर्शन झाले.

१ आ. सौ. अनघा जोशी यांनी नामाचा गजर चालू केल्‍यावर मधुरा यांच्‍या मनातही नामाचा गजर चालू होणे : हा गजर ऐकत असतांना सौ. अनघा डोळे मिटून पूर्णपणे तल्लीन होऊन हा नामाचा गजर म्‍हणत होत्‍या. तेव्‍हा माझ्‍याही मनात हा नामाचा गजर चालू झाला आणि आनंद जाणवू लागला.

सौ. अनघा जोशी

२. श्री. सोवनी यांनी तबल्‍यावर भजनी ठेका वाजवल्‍यावर सूक्ष्म स्‍तरावर झालेला परिणाम

श्री. सोवनी यांनी तल्लीन होऊन तबल्‍यावर भजनी ठेका सादर केला. हा ठेका ऐकत असतांना तबल्‍यातून अधिक प्रमाणात सात्त्विक नादलहरींचे प्रक्षेपण होऊन ऐकणार्‍यांचा भाव जागृत होत होता आणि पुष्‍कळ प्रमाणात चैतन्‍यही जाणवत होते.

३. भक्‍तीरसाने ओतप्रोत असलेला नाद प्रगट होऊन हा प्रयोग अन्‍य प्रयोगांच्‍या तुलनेत अधिक प्रमाणात भावमय, चैतन्‍यदायी आणि आनंदमय होणे

कु. मधुरा भिकाजी भोसले

भक्‍तीच्‍या ठेक्‍यावर तबलावादन केल्‍यामुळे अन्‍य प्रयोगांच्‍या तुलनेत या प्रयोगाच्‍या वेळी अधिक प्रमाणात भाव जागृत होत होता. या प्रयोगाच्‍या वेळी तबलावादन आणि शास्‍त्रीय गायन यांचा मिलाप होऊन त्‍यांतून उत्‍पन्‍न झालेल्‍या सात्त्विक नादातून ‘भक्‍तीरस’ पुष्‍कळ प्रमाणात प्रगट झाला होता. त्‍यामुळे हा प्रयोग अन्‍य प्रयोगांच्‍या तुलनेत अधिक प्रमाणात भावमय, चैतन्‍यदायी आणि आनंदमय झाला होता.

४. सौ. अनघा यांनी केलेले गायन आणि श्री. सोवनी यांनी केलेले तबलावादन यांमध्‍ये सूक्ष्म स्‍तरावर जाणवलेला भेद

कृतज्ञता : श्रीगुरूंच्‍या कृपेमुळे श्री. सोवनींचा तबल्‍यावरील भजनी ठेका आणि सौ. अनघा यांच्‍या मधुर आवाजातील अभंग अन् नामाचा गजर ऐकण्‍यास मिळाला, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.