१. फ्रान्समधील हिंसाचाराला साम्यवादी आणि कट्टर इस्लामवादी यांचा पाठिंबा !
‘फ्रान्समध्ये धर्मांधांनी २-३ सहस्र वाहने जाळली, शोरूम्स जाळली, लूटमार केली आणि एक पुष्कळ प्राचीन वाचनालयही जाळले. एक १७ वर्षार्ंचा मुलगा नाहील होता. त्याची आजी आता समोर आली आहे. ‘सर्वांनी तिच्या नातवाच्या मृत्यूचा लाभ उठवणे बंद करावे, ही जाळपोळ, लूटमार आणि हिंसाचार बंद करावा’, असे तिचे म्हणणे आहे. आता वेळ निघून गेली आहे. आजीने हे काही दिवसांपूर्वीच करायला हवे होते. आता फ्रान्स जळाले आहे. फ्रान्समध्ये हा जो गोंधळ चालू आहे, त्याला पाठिंबा देणारे भारतात पुष्कळ आहेत. विशेषत: साम्यवादी आणि कट्टरतावादी मुसलमान हे त्याला पाठिंबा देतात. त्यांची युती आपल्याला जगभरातील स्टुडिओमध्ये पहायला मिळेल. एक बोलल्यावर त्याला दुसरा संरक्षण देतो. दुसरा बोलल्यावर त्याला पहिला संरक्षण देतो, म्हणजे हे एकमेकांना पूरक आहेत. इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिका या देशांमध्ये हेच झाले. ‘अंतिफा’च्या (एक साम्यवादी संघटनेच्या) लोकांनी कृष्णवर्णियांना पाठिंबा दिला. सर्व बरोबर असले पाहिजे, हे आम्हालाही कळते; परंतु ‘आम्ही सर्व जाळून टाकू’, असे म्हणणे हा कुठला न्याय आहे ?
२. उदारमतवादी लोकशाही लोकांचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याची भावना धोकादायक !
याविषयी फ्रान्समध्ये आता हळूहळू जागृती होत आहे. सध्या युरोपची प्रतिमा ही अतिशय सौम्य, अत्याधुनिक आणि सुसंस्कृत अशी आहे. हा सर्व मागील ७५ ते ८० वर्षांचा विषय आहे. आपण ८० वर्षे मागे गेलो आणि दुसर्या महायुद्धाचा काळ आठवला, तर त्यांचे वास्तविक स्वरूप आपल्या समोर येते. या युद्धात फॅसिस्टवादाने (हुकूमशाहीने) कोट्यवधी लोक मारले गेले. अनेक शहरे आणि भाग उद़्ध्वस्त झाले. आता बोलून काही उपयोग नाही. फ्रान्समध्ये ज्यांच्या गाड्या जळाल्या, ज्यांच्या पत्नी आणि मुले यांच्यावर आक्रमणे झाली, ज्यांची दुकाने अन् शोरूम्स जळाली, त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल, याची कल्पना येते. ज्यांनी त्यांच्या जीवनभराची मिळकत व्यवसायामध्ये लावली होती, असे व्यवसायही या हिंसाचारामध्ये बेचिराख झाले. त्यांची काय चूक होती ? ज्याने १७ वर्षांच्या नाहेलवर गोळी चालवली होती, त्याला नाहेल कोण आहे ? हे ठाऊकही नव्हते. दंगलखोरांनी ज्यांची दुकाने जाळून नष्ट केली, ते हेच म्हणतील, ‘फ्रान्सच्या लोकशाहीतच समस्या आहे. ही उदारमतवादी लोकशाही मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवू शकत नाही. त्यामुळे मला त्याच फॅसिस्टवादी शक्तींना मतदान करावे लागेल. त्यांची सत्ता आली पहिजे; कारण तेच बलवान आणि कट्टर असून अशांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ शकतील’ आणि हे होईल.
३. दुसर्या महायुद्धात आत्मघातकी आक्रमणाने शत्रूचा घात करणारा जपान !
आता चीनने जपानला हळूहळू त्रास देणे चालू केले आहे. ज्या वेळी हिरोशिमा-नागासाकी शहरांवर अणूबाँब टाकण्यात आला, तेव्हा जपानने सैन्य बनवण्याचे टाळले. केवळ स्वसंरक्षण करण्याइतपत लहानसे सैन्य बनवले. त्यानंतर तो कोणत्याही वादविवादात पडला नाही आणि युद्धाची तर गोष्टच सोडून दिली. अनुमाने ८० वर्षांपासून जपान शांत आहे. आता चीन त्याला त्रास देत आहे. हा तोच जपान आहे, ज्याचे ‘मित्सुबिशी’ हे आस्थापन धुलाई यंत्रापासून चारचाकी वाहने बनवण्याचे काम करत आहे. ८५ वर्षांपूर्वी हे आस्थापन ‘झिरो’ नावाचे लढाऊ विमाने बनवत होते. या विमानांसमोर दारूगोळा लावला जात होता. त्या विमानांना अमेरिकेच्या जहाजावरून लक्ष्य केले जायचे, तेव्हा जपानी पायलट जळत्या ‘झिरो’ विमानासह आत्मघातकी आक्रमण करून अमेरिकी, म्हणजे शत्रूच्या जहाजामध्ये घुसायचे आणि संपूर्ण जहाज पाण्यात बुडवून टाकायचे. ‘आम्ही मरू; पण तुम्हाला घेऊन मरू’, अशी त्यांची पद्धत होती. त्याला ‘कामाकाझी’ म्हणतात. हा जपानचा भूतकाळ राहिला आहे. आपल्या देशाला वाचवण्यासाठी त्यांच्या लोकांना आत्मघातही मान्य होता. आत्मघातकी आक्रमणाचा प्रारंभ तेथूनच झाला आहे. जपानने हे दुसर्या युद्धात केले आहे. आता चीन जपानला त्रास देत आहे. त्यामुळे जपानमध्ये पुन्हा भूतकाळ जन्म घेत आहे.
४. युरोप त्याच्या मूळ स्वरूपात आल्यास जगाला महागात पडेल !
युरोपमध्येही हेच होत आहे. आतापर्यंत युरोप शांत बसला होता. तेथील लोक व्यवसाय आणि व्यापार करण्यात व्यस्त होते. काही वर्षांपूर्वी तेथे अधिकृत-अनधिकृत स्थलांतरित आले आणि त्यांनी युरोपला त्रास देणे चालू केले. त्यामुळे पूर्वीची एका मोठ्या दगडाखाली दडलेली राक्षसी शक्ती पुन्हा बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास ती युरोपमध्येच नाही, तर संपूर्ण जगात आग लावेल. या दंगलखोरांना बुद्धी नाही. त्यांना ठाऊक नाही की, युरोपचे वरून शांत दिसणारे रूप आताचे आहे. युरोप ही सहस्रो वर्षांच्याही आधीपासून हत्यासत्राची भूमी राहिली आहे.
५. जगभरातील मुसलमान देशांमध्ये लोकशाही, मानवाधिकार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांचा दुष्काळ !
काही दिवसांपूर्वी स्वीडनमध्ये कुराण जाळण्यात आले होते. तेव्हा त्याचा इराणने निषेध केला होता आणि तेथे राजदूत पाठवण्यास नकार दिला. पाकिस्तानने मात्र त्यांचा राजदूत परत बोलावला नाही; कारण पाकिस्तानला पैसे हवे आहेत. पाकिस्तान स्वत:ला ‘इस्लामिक रिपब्लिक पाकिस्तान’ म्हणवून घेतो. थोड्या पैशासाठी पाकिस्तानने इस्लाम विकला आहे. फ्रान्समध्ये महंमद पैगंबर यांचे कार्टून काढल्याचे प्रकरण झाल्यावर लोकांनी लाहोरमध्ये आग लावली होती. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहवाज शरीफ फ्रान्समध्ये जाऊन पैसे घेऊन आले.
‘आर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’मध्ये ५७ मुसलमान देश आहेत. ते म्हणतात, ‘कुराण जाळणे अयोय आहे.’ अशी कृती कुणीही करू नये. कुणाच्याही धार्मिक ग्रंथांचा असा अवमान करणे अयोग्य आहे. याखेरीज ते लोक म्हणतात की, ‘हे लोकशाही मूल्ये, मानवी अधिकार, अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या विरोधात आहे.’ ते दुसर्यांना ज्ञान पाजत आहेत; पण ५७ सदस्य देशांपैकी ९९ टक्के देशांमध्ये असे काहीही नाही. त्यांच्या देशात लोकशाही, मानवी अधिकार, अभिव्यक्तीस्वातंत्र्य कुठे दिसत नाही.’
– मेजर गौरव आर्य (निवृत्त)
(साभार : ‘रिपब्लिक भारत’ वृत्तवाहिनी)