लोकहो, अन्याय सहन करू नका !      

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे. शुद्ध दूध, अन्नधान्य, इंधन आदी मिळणे, हा आपला अधिकार असल्याने त्यासाठी सामाजिक अपप्रवृत्तींविरुद्ध लढले पाहिजे. शासनाकडून भरपूर वेतन मिळूनही जनतेला लुटणार्‍या शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांना सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे. या अन्याय करणार्‍या सामाजिक आणि शासकीय क्षेत्रांतील दुष्प्रवृत्ती धर्मनिरपेक्ष व्यवस्थेमुळे निर्माण झाल्या आहेत. लोकहो, या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींचा अन्याय सहन करू नका, तर त्यांच्या विरोधात वैध मार्गाने संघर्ष करून त्यांना रोखणे, हे सुराज्य निर्मितीतील पहिले पाऊलच आहे.

(संदर्भ – हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती’)