साधना सत्‍संगातील एका जिज्ञासू महिलेच्‍या विचारांत गुरुकृपेने झालेले पालट

कु. पूनम चौधरी

१. साधना करत असल्‍याने ‘स्‍वतःला मूल नाही’, याचे एका जिज्ञासू महिलेला दुःख न वाटणे

‘एकदा सत्‍संगातील एक जिज्ञासू महिलेने सांगितले, ‘‘मला काही शारीरिक अडचणींमुळे मूल होत नव्‍हते. माझी अन्‍य वैद्यकीय प्रक्रिया करण्‍याची इच्‍छा नव्‍हती. पूर्वी मला ‘मूल होत नाही’, या गोष्‍टीचे पुष्‍कळ दुःख वाटत होते. समाजातील लोकही मला बोलत असत. मी साधनेत आल्‍यानंतर मला ती गोष्‍ट स्‍वीकारता आली. आता मला त्‍या गोष्‍टीचे काहीच वाटत नाही.’’

२. जिज्ञासू महिलेला साधनेचा दृष्‍टीकोन देणे

तेव्‍हा मी त्‍यांना सांगितले, ‘‘ही भगवंताची इच्‍छा आहे. ईश्‍वराने आम्‍हाला राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या कार्यासाठी निवडले आहे. ईश्‍वराला तुमच्‍याकडून मोठे कार्य करून घ्‍यायचे असेल.’’

३. जिज्ञासू महिलेला घरापेक्षा आश्रमात चांगले वाटणे

एक दिवस त्‍या ताई (जिज्ञासू महिला) सकाळपासून देहली सेवाकेंद्रात सेवेसाठी आल्‍या होत्‍या. सायंकाळी त्‍या ताईंचे यजमान कार्यालयातून सेवाकेंद्रात त्‍या ताईंना घरी घेऊन जाण्‍यासाठी आले. त्‍या वेळी त्‍या दादांच्‍या पाठीत वेदना होत होत्‍या. आम्‍ही त्‍यांचे विश्रांती घेण्‍याचे नियोजन केले. तेव्‍हा ताईंना पुष्‍कळ कृतज्ञता वाटली. त्‍यांनी सांगितले, ‘‘आश्रमात आल्‍यानंतर मला जे हवे होते, ते मिळाले. आता मला घरापेक्षा आश्रमात चांगले वाटते.’’

४. कृतज्ञता

तेव्‍हा माझी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेने गुरुदेवांच्‍या श्री चरणांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त झाली. गुरुदेव प्रत्‍येक जिवाला सांभाळत आहेत. १४ भुवनांमधील (सप्‍तलोक आणि सप्‍तपाताळ यांतील) कोणत्‍याही जिवाने विष्‍णुस्‍वरूप गुरुदेवांचे स्‍मरण केले, तरीही गुरुदेव, आपणच त्‍याचे सर्व करत आहात ! आम्‍ही सर्व जीव आपल्‍या परम दिव्‍य श्रीचरणी शरणागतभावाने कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (२७.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक