माझा भारत महान !

सार्‍या जगात माझा, भारत बलवान आहे ।
सार्‍या जगात त्याचा मोठाच मान आहे ।
सार्‍या जगात माझा, भारत महान आहे ।
जय भारत, जय हिंदुस्थान ।। धृ. ।।

मर्यादा पुरुषोत्तम रामाचा वास इथेच झाला ।
पूर्णावतार कृष्णाचा रास इथेच झाला ।
सार्‍या संतमहात्म्यांचा उदय इथेच झाला ।
सार्‍या जगात याची संस्कृती महान आहे ।। १ ।।

तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शिवाजी ।
महाराणा प्रताप, सुभाष, गुरु गोविंद सिंहजी ।
भगतसिंह, सावरकर, मंगल पांडे, छत्रपती संभाजी ।
सार्‍या जगात त्यांचे शौर्य महान आहे ।। २ ।।

विश्वशांतीचा संदेश इथून जगात गेला ।
बुद्ध, महावीर, कबिराचा उदय इथेच झाला ।
नीती, सदाचाराचा संस्कार इथेच झाला ।
सार्‍या जगात गीतेला मोठाच मान आहे ।। ३ ।।

मायभूला अजून बलशाली, प्रगत करूया ।
इथे संपन्नता, समानता, राष्ट्रभक्ती जोपासूया ।
आपल्या स्वप्नातला अखंड भारत बनवूया ।
सार्‍या जगात माझा भारत भाग्यवान आहे  ।। ४ ।।

– डॉ. प्रकाशदादा देशमुख, अकोला