वर्ष १९५५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीच्या फ्रान्सिस वॉटसनने घेतलेल्या मुलाखतीत सांगितले, वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान अकस्मात् भारतास स्वातंत्र्य देण्यास सिद्ध का आणि कसे झाले ?, याचे मला मोठे रहस्य वाटते; पण ते कधीतरी बाहेर येईल. बोस यांनी निर्माण केलेल्या आझाद हिंद सेनेमुळे इंग्रज घाबरून गेले. गांधीजींच्या अहिंसेमुळे ब्रिटीश भारतीय सेनेवर काही फरक पडणार नव्हता. भारतावरची सत्ता भारतीय सेनेविना दुसरे कुणीच काबीज करू शकणार नव्हते. ते काम सुभाषचंद्रांनी केले; म्हणून ब्रिटनने भारत सोडला.