|
आजमगड (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील महाराजगंज येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील शिवशंकरी महेशपूर गावात धार्मिक सभेचे आयोजन करून त्यामध्ये भूतबाधा दूर करणे, तसेच पैशांची लालूच दाखवून उपस्थित हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालवला जात होता. या विषयीची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी याला विरोध दर्शवला. पोलिसांना बोलावून छापेमारी करण्यात आली. या वेळी दोन महिलांना अटक करण्यात आली.
चंगाई सभा के नाम पर कराया जा रहा था भोले-भाले हिंदुओं का कन्वर्जन।
पुलिस ने दो महिलाओं को हिरासत में लिया।
गरीबी के पीछे भूत-प्रेत का होना बताकर लोगों को इकठ्ठा किया गया था।
मौके से ईसाई समुदाय से जुड़ी चीजें बरामद हुई हैं।
मामला यूपी के आजमगढ़ का।https://t.co/rTSkFS5syd
— Panchjanya (@epanchjanya) August 14, 2023
पोलीस आयुक्त संजय कुमार म्हणाले की, जिल्ह्यात धर्मांतराचे प्रकार याआधीही झाले आहेत. धर्मांतर करणार्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यानंतरही जिल्ह्यातील धर्मांतर थांबण्याचे नाव घेत नाही.
संपादकीय भूमिकाख्रिस्ती मिशनर्यांना राज्यात लागू असलेल्या धर्मांतरबंदी कायद्याचा कोणताच धाक नाही, हेच वारंवार घडणार्या अशा घटनांतून लक्षात येते. त्यांना एवढे धाडस होतेच कसे, त्यांच्या पाठीशी कोणती राजकीय शक्ती आहे, याचे अन्वेषण होऊन त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! |