(म्हणे) ‘पंतप्रधानांनी १५ ऑगस्टच्या भाषणात नूंह येथील लक्ष्यित कारवाईचा निषेध केला पाहिजे !’ – एम्.आय.एम्. चे खासदार असदुद्दीन ओवैसी

  • एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी पुन्हा बरळले !

  • नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या  कारवाईवरून वक्तव्य !

एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – नूंहच्या मुसलमानांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले. वर्ष १९४७ मध्ये म. गांधींनी नूंहच्या मुसलमानांना पाकमध्ये जाण्यापासून रोखले होते. आम्ही नूंह येथील हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो; परंतु एका समुदायाला सरसकट लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या १५ ऑगस्टच्या भाषणातून नूंहमध्ये सरकारकडून घरे आणि दुकाने पाडण्याच्या कारवाईचा निषेध केला पाहिजे. ही लक्ष्यित हिंसा निषेधार्ह आहे. सहस्रावधी लोकांना तुम्ही बेघर करून टाकले. हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये तुम्ही अशा प्रकारे कायदा हातात घेऊ शकत नाही, असे वक्तव्य एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य करून ओवैसी महाशयांना नूंहमध्ये धर्मांध मुसलमानांनी केलेला विद्ध्वंस, तेथील शेकडो गाड्यांना लावलेली आग, पोलीस ठाण्याला जाळण्याचा प्रकार आदी भयावह घटनांना पाठीशीच घालायचे आहे, हे जाणा !