सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव ११ मे २०२३ या दिवशी साजरा झाला. या ब्रह्मोत्सवातील ध्वजपथकामध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर साधिका कु. भाग्यश्री धांडे यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
१. ‘मला ध्वजपथकामध्ये सेवा करायला मिळणार आहे’, असे कळल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्यावर मला भाववृद्धी होण्यासाठी पुढील दोन प्रयोग करण्याचे सुचले.
अ. सर्वसाधक गोप-गोपी असून श्रीकृष्णरूपी गुरुदेव सर्व साधकांच्या समवेत आहेत.
आ. मैदानामध्ये गुरुदेव शेषशायी श्रीविष्णूच्या रूपात असून त्यांनी मैदानाचा मधला भाग पूर्ण व्यापला आहे आणि आम्ही त्यांना प्रदक्षिणा घालत आहोत.
२. भाव ठेवून सराव करतांना मला थकवा जाणवला नाही आणि गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते.
३. ब्रह्मोत्सवाच्या २ दिवस आधी जेव्हा सराव असायचा, तेव्हा ऊन असल्याने मला पुष्कळ घाम यायचा; मात्र ब्रह्मोत्सवाच्या दिवशी फेरी चालू असतांना प्रार्थना केल्याने उन्हाचा प्रभाव अल्प झाल्याने घामही अल्प प्रमाणात आला.
४. फेरी चालू होण्यापूर्वी ‘मी ध्वजपथकामध्ये सेवा करू शकेन का ?’, असा विचार आला. जेव्हा प्रत्यक्षात ब्रह्मोत्सवामध्ये फेरी चालू झाली, तेव्हा माझे मन शांत होऊन मला माझ्या अस्तित्वाचा विसर पडला.
‘गुरुदेव, तुमच्याच कृपेने तुम्ही करत असलेली कृपा अनुभवायला मिळाली आणि सेवेच्या माध्यमातून तुम्ही आनंदही दिला, त्याबद्दल कृतज्ञता.’
– कु. भाग्यश्री धांडे, फोंडा, गोवा. (२४.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |