चीन आणि पाक यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘हेरॉन मार्क २’ ड्रोन्स तैनात !

भारतीय बनावटीच्या या ड्रोन्समध्ये ३६ घंट्यांपर्यंत कार्यरत रहाण्याची क्षमता !

नवी देहली – चीन आणि पाक यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय वायूसेनेने सीमेवर ‘हेरॉन मार्क-२’ हे ड्रोन्स तैनात केले आहेत. हे ड्रोन्स एकाच वेळी चीन आणि पाक दोघांवर लक्ष ठेवू शकतात. विशेष म्हणजे हे ड्रोन्स दूरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकतात, तसेच ते अन्यही शस्त्रास्त्र प्रणालींनी युक्त आहेत. अशा प्रकारचे ४ ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. हे ड्रोन्स दूरच्या अंतरापर्यंत साधारण ३६ घंटे कार्यरत राहू शकतात.

या ड्रोनचे अधिकारी विंग कमांडर पंकज राणा म्हणाले की, हे ड्रोन कोणत्याही हवामानात तसेच कोणत्याही ठिकाणी चांगल्याप्रकारे कार्यरत राहू शकते. हे ड्रोन्स ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत भारतीय बनावटीचे आहेत.