कर्तव्यावर मृत्यू आलेल्या पोलिसाच्या पत्नीचे निवृत्तीवेतन पुनर्विवाहानंतरही चालू रहाणार !

मृत पोलिसाच्या कुटुंबियांचे दायित्व स्वीकारावे लागणार !

मुंबई – कर्तव्यावर असतांना मृत्यू आलेल्या पोलिसाच्या पत्नीने पुनर्विवाह केल्यास तिचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते. हे निवृत्तीवेतन पुन्हा चालू करण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागाने घेतला आहे; मात्र असे करतांना पुनर्विवाह करणार्‍या मृत पोलिसाच्या पत्नीने पोलिसाच्या कुटुंबियांचे दायित्व स्वीकारणे बंधनकारक असणार आहे. मृत पोलिसाच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणारे त्यांचे वयोवृद्ध आई-वडील, अविवाहित किंवा दिव्यांग बहीण-भाऊ, अज्ञान पाल्य यांच्या पालनपोषणाचे दायित्व विधवा पत्नीला स्वीकारावे लागणार आहे. तसे नसेल, तर हा लाभ बंद करण्यात येणार आहे.