नाशिक – हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करावी’ याविषयीचे निवेदन नाशिक जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र वाघ यांना देण्यात आलेे.
या निवेदनाद्वारे शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी, जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन आणि विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी, सर्व शाळांमधून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, आशा मागण्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील २ तहसील कार्यालये, २ पोलीस ठाणी, १७ शाळा यांना निवेदन देण्यात आले.