ठाणे येथील सौ. नम्रता ठाकूर यांनी गाठली ६४ टक्क्यांवरून ६७ टक्के आध्यात्मिक पातळी !

१ मासात आध्यात्मिक पातळीत ३ टक्क्यांनी वृद्धी !

आध्यात्मिक पातळी वाढल्याचे ऐकूनही स्थिर राहून स्वतःकडून झालेल्या चुकीविषयी सद्गुरूंना सांगणार्‍या अंतर्मुख वृत्तीच्या सौ. नम्रता ठाकूर !

सद्गुरु अनुराधा वाडेकर

वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेला त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. रुग्णाईत असूनही सातत्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा आणि अनुसंधानात राहून कृतज्ञता भावामुळे अवघ्या १ मासातच त्यांची आध्यात्मिक पातळी ३ टक्क्यांनी वाढून ६७ टक्के एवढी झाली आहे. मी जेव्हा सौ. काकूंना आध्यात्मिक पातळी वाढल्याचे सांगितले, त्या वेळीही त्यांची अंतर्मुखता एवढी होती की, त्या त्यांच्याकडून आधी कधीतरी घडलेली चूक मला सांगण्याचा प्रयत्न करत होत्या.

– सद्गुरु अनुराधा वाडेकर

सौ. नम्रता ठाकूर

ठाणे – रुग्णाईत असूनही सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात आणि कृतज्ञताभावात असलेल्या ठाणे येथील सनातनच्या साधिका सौ. नम्रता ठाकूर यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्क्यांवरून वरून आता ६७ टक्के झाली आहे, ही आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी १२ ऑगस्ट २०२३ या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली. या वेळी सौ. नम्रता ठाकूर यांच्यासह त्यांचे यजमान श्री. नंदकिशोर ठाकूर, मुलगा श्री. अंकुर ठाकूर, सून सौ. अनन्या ठाकूर, नात कु. अनिषा ठाकूर, मुलगी कु. मयुरी ठाकूर, भाऊ श्री. मिलिंद करंगुटकर, वहिनी सौ. शामल करंगुटकर, तसेच परिचारिका सौ. कविता शिरोडकर उपस्थित होत्या. ही आनंदवार्ता ऐकून सौ. ठाकूर यांच्यासह सर्वांचाच भाव जागृत झाला.

सनातनच्या साधिका सौ. प्राजक्ता ढगे यांच्याकडून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाठवलेला प्रसाद स्वीकारतांना सौ. नम्रता ठाकूर

क्षणचित्रे – या वेळी सौ. ठाकूर यांच्या घरातील सर्वजण भावुक होऊन आनंदी झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून पाठवलेला प्रसाद सौ. ठाकूर यांना देण्यात आला.

सौ. नम्रता ठाकूर यांचे मनोगत !

सौ. नम्रता ठाकूर यांचा भाव जागृत होऊन त्या म्हणाल्या, ‘‘सद्गुरु अनुराधाताई, तुमच्यामुळेच हा आनंदाचा दिवस आला. तुम्ही माझ्या आई आहात. सद्गुरु अनुराधाताई आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !’’