कुख्‍यात गुंड अज्‍जू ठाकूर याचा भाजपमध्‍ये प्रवेश !

कुख्‍यात गुंड अजय उर्फ अज्‍जू ठाकूर याचा भाजपमध्‍ये प्रवेश

अकोला – येथील कुख्‍यात गुंड अजय उर्फ अज्‍जू ठाकूर याचा भाजपमध्‍ये प्रवेश झाला आहे. यामुळे सर्वत्र आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे. त्‍याच्‍यावर मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्‍हे नोंद आहेत. अकोला पोलिसांनी १८ एप्रिल २०२० या दिवशी ठाकूर याची रस्‍त्‍याने धिंड काढली होती.