५४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. वैदेही मनोज खाडये (वय १६ वर्षे) हिला नामजप करतांना सुचलेली कविता येथे दिली आहे.
ज्यांनी आम्हाला साधनेत आणले ।
आमची पात्रता नसतांना शिष्य म्हणून स्वीकारले ।
असे परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला गुरु म्हणून लाभले ।। १ ।।
ज्यांच्यामुळे अशक्य ते शक्य झाले ।
ज्यांच्या वाढदिनी त्यांचे चरण आम्ही पाहिले ।
असे परात्पर गुरु डॉक्टर आम्हा गुरु म्हणून लाभले ।। २ ।।
अहं निर्मूलन, व्यष्टी साधनेचे लिखाण शिकवले ।
परिपूर्ण सेवा आणि गुणसंवर्धन करायला शिकवले ।
सर्वांना ते आपलेसे वाटले ।
असे परात्पर गुरु डॉक्टर आम्हा गुरु म्हणून लाभले ।। ३ ।।
साधकांनी आदर्श तुमचा ठेवला ।
साधना करून मोक्षप्राप्ती हे ध्येय ठरवले ।
ज्यांनी आम्हाला साधनेचे सर्व मार्ग दाखवले ।
असे परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला गुरु म्हणून लाभले ।। ४ ।।
ज्यांनी साधकांचे आध्यात्मिक त्रास स्वतःवर घेतले ।
सर्व साधकांचा उद्धार करण्याचे कार्य हाती घेतले ।
असे परात्पर गुरु डॉक्टर आम्हा गुरु म्हणून लाभले ।
आणि काय हवे जीवनात, असे मला वाटले ।। ५ ।।
तुम्ही आमचे माता-पिता ।
तुम्हीच भाग्यविधाता ।
ही कविता तुम्हीच लिहून घेतली ।
त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ।। ६ ।।
– कु. वैदेही मनोज खाडये, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२२.५.२०२०)