गोवा येथील शास्‍त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी केलेल्‍या शास्‍त्रीय गायनाचे सूक्ष्म परीक्षण !

‘२५.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथे महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने गोवा येथील श्री. गौरीश तळवलकर यांच्‍या शास्‍त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता. त्‍याचे देवाने माझ्‍याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.

श्री. गौरीश तळवलकर

१. श्री. गौरीश तळवलकर यांच्‍या गायनातून वातावरणात सात्त्विक लहरींचे प्रक्षेपण होत होते. त्‍यामुळे मला माझ्‍या अनाहतचक्राच्‍या ठिकाणी चांगल्‍या संवेदना जाणवत होत्‍या.

२. श्री. तळवलकर रागातील स्‍वर आर्ततेने आळवत होते. त्‍या वेळी मला मिळणार्‍या आनंदात आणखी वाढ होत होती.

३. गायन चालू असतांना श्री सरस्‍वतीदेवीचे अस्‍तित्‍व काही वेळ जाणवले.

श्री. राम होनप

४. गायनात राग ‘यमन’ चालू असतांना त्‍यात ‘नादब्रह्म गुणसागर’ असे शब्‍द अधूनमधून होते. नादब्रह्म, म्‍हणजे नादातील ब्रह्म किंवा आनंद होय. श्री. तळवलकर यांच्‍या गायनातून नादब्रह्माची, म्‍हणजेच आनंदाची अनुभूती मला येत होती.

५. श्री. तळवलकर यांचे गायन चालू असतांना त्‍यांच्‍या शरिराच्‍या भोवतीची दैवी आभा हळूहळू मोठी होतांना मला सूक्ष्मातून दिसली.

६. श्री. तळवलकर यांनी ‘नादब्रह्म गुणसागरको’ हे गायन सादर केले. त्‍या वेळी वातावरणात सूक्ष्मातून पांढर्‍या रंगाचे दैवी कण निर्माण झाले. त्‍यानंतर त्‍यांनी ‘रंग दे, रंग दे, रंगरेजवा ।’ हे गायन सादर केले. त्‍या वेळी वातावरणात सूक्ष्मातून विविध रंगी दैवी कण निर्माण झाले.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्‍त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.