सीमा हैदर हिला हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याची भारतीय निर्मात्याने दिली संधी !

निर्माते अमित जानी यांनी सीमा भारतात आल्याच्या पद्धतीचे मात्र समर्थन केलेले नाही !

सीमा हैदर आणि सचिन (डावीकडे) निर्माते अमित जानी (उजवीकडे)

नवी देहली – प्रियकर सचिनसाठी पाकिस्तान सोडून पळून आलेली सीमा हैदर ही गुप्तहेर आहे का, याचे अन्वेषण चालू असतांना दोघांना पैसे कमावण्यासाठी घराबाहेर जाता येत नाही, असे सांगितले जात आहे. मुळातच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. अशातच ‘उत्तरप्रदेश नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष अमित जानी यांनी या उभयतांना त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे.

‘जानी फायर फॉक्स’ या नावाने निर्मिती आस्थापन असणार्‍या अमित जानी यांना गेल्या वर्षी उदयपूरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी कन्हैयालाल या कपडे शिवणार्‍या धर्मप्रेमी हिंदूच्या शिरच्छेदावर आधारित चित्रपट सिद्ध करायचा आहे. ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ या नावाने निर्मित करण्यात येणारा हा चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असून त्यासाठी सचिन आणि सीमा यांना काम करण्यासाठी विचारण्यात आले आहे. अर्थात् दोघांनी चित्रपटात काम करणार कि नाही, यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. ‘सीमा हैदर ज्या पद्धतीने भारतात शिरली, त्याचे मी समर्थन करत नाही’, असेही जानी यांनी स्पष्ट केले आहे.