१. केवळ दुसर्यांचे कल्याण करण्याच्या विचारानेच हृदयात सिंहासमान बळ येते.
२. तुमच्यात जी योग्यता आहे, तिला ‘बहुजनहिताय’ (सर्वांच्या हितासाठी) खर्च करा (वापरा). त्यामुळे तुम्ही सुयोग्य बनाल.
३. आजपर्यंत तुम्ही जगाचे जे काही जाणले आहे, ते आत्मा-परमात्म्याच्या ज्ञानापुढे (ब्रह्मज्ञानापुढे) कवडीमोलाचेही नाही.
४. ज्याला आपण सोडू पाहिले, तरी कधी सोडू शकत नाही, त्याचेच नाव आहे ‘भगवंत’ आणि ज्याला आपण ठेवू इच्छितो, तरी सदा ठेवू शकत नाही, त्याचेच नाव आहे ‘संसार’ !
(संदर्भ : लोक कल्याण सेतू, मार्च २०२०)