१. सौ. आनंदिता दासगुप्ता (पू. संजीव कुमार यांची धाकटी कन्या)
१ अ. मुलांपेक्षा साधकांना प्राधान्य देणे : ‘सर्व साधक आपलीच मुले आहेत’, असा बाबांचा भाव असतो. त्यांनी आमच्यामध्ये आणि साधकांमध्ये कधी भेदभाव केला नाही. आम्ही लहानपणापासून पहात आहोत, ‘सर्व साधक आमच्या घरी येतात. तेव्हा बाबा नेहमीच साधकांना प्राधान्य देतात.’ हे गुण माझ्या आई-बाबांमध्ये (पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्यामध्ये) आहेत.’
२. अनन्या (पू. संजीव कुमार यांची मोठी कन्या)
२ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर दृढ श्रद्धा असणे : ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘सर्वांनी अग्निहोत्र करायला पाहिजे’, असे सांगितले, तेव्हापासून माझे बाबा प्रतिदिन अग्निहोत्र करतात. काही वेळा त्यांना बाहेरगावी जावे लागते. तेव्हा ते अग्निहोत्र करण्याचे नियोजन करून गावाला जातात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘अग्निदेवच आपलेे रक्षण करतात.’’ ‘त्यावर त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळेच आम्ही कोरोनाच्या काळात वाचलो’, असे मला वाटते.
२ आ. सात्त्विक उत्पादनांप्रतीचा भाव : आमच्या घरात सनातनची सात्त्विक उत्पादने आणल्यावर माझ्या आईने (पू. माला कुमार यांनी) सात्त्विक उत्पादने ठेवण्यासाठी खोलीला रंगकाम करून घेतले. कपाटाला ‘पॉलिश’ करून घेतले आणि उत्पादनांची सुंदर मांडणी केली. तिने सर्व उत्पादने सजवली आणि इतकी सुंदररित्या ठेवली आहेत की, आई घरात नसली, तरी दुसरे कुणीही कोणतेही उत्पादन देऊ शकतो.’
३. श्री. सुरेश मुंजाल (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), देहली
३ अ. सहजता : ‘पू. संजीवभैय्या यांच्यामध्ये कृत्रिमता नसते. ते नेहमी अगदी सहजतेने बोलतात. ‘गुरुदेवांनी सांगितलेली साधना करत रहायची. त्यात कुठेही कृत्रिमता नसावी’, असा त्यांचा भाव असतो.’
४. कु. कृतिका खत्री, देहली
४ अ. प्रीती : ‘आम्हाला नेहमी ‘पू. संजीवभैय्या आणि पू. (सौ.) माला कुमार हे आमचे आई-वडीलच आहेत’, असे वाटते. त्यांच्या सान्निध्यात आम्हाला आई-वडिलांपेक्षाही अधिक प्रेम मिळते. आम्हाला त्यांच्यामध्ये गुरूंची प्रीती नेहमीच अनुभवायला मिळते.
४ आ. त्यांचे केवळ स्मरण केले, तरी माझे मन आपोआप आनंदी होते आणि माझ्या चेहर्यावर आपोआप हास्य येते.’
५. श्री. प्रणव मणेरीकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), देहली
अ. ‘पू. संजीवभैय्यांच्या घरी गेल्यानंतर ‘हे आपलेच घर आहे’, असे वाटते. त्यांच्या घरी साधक आणि नातेवाईक असा भेदभाव नसतो.’
६. सौ. मंजू गुप्ता (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६४ वर्षे), देहली
६ अ. साधकांच्या प्रत्येक अडचणीवर उपाययोजना काढणे : ‘पू. संजीवभैय्या आणि पू. मालादीदी प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. ‘कुणाला तिकीट मिळत नाही, भोजनाची व्यवस्था करायची आहे, कुणाला सोडायला जायचे आहे किंवा कुणाला शहरात कुठे जायचे आहे’, अशा प्रत्येक अडचणीवर ते सुविधा उपलब्ध करून देतात.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.५.२०२३)