(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

  • काँग्रेसचे आसाम प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांचे लव्ह जिहादच्या घटनेवरून संतापजनक विधान !

  • बोरा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा

गोलघाटा (आसाम) – युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये अशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणी समवेत पळून गेले होते. राज्याचे मुख्यमंत्री सरमा यांना आजच्या काळात वेगवेगळ्या धर्मांमध्ये विवाह करण्यावरून गोंधळ निर्माण करू नये, असे विधान आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी केले आहे. बोरा यांनी येथील लव्ह जिहादच्या घटनेवरून हे विधान केले. त्यांच्याविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथे नजीबुर रहमान याने हिंदु नाव सांगून हिंदु तरुणी संघमित्रा घोष हिला प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते आणि नंतर तिची अन् तिच्या आई-वडिलांची हत्या केली होती.

आम्ही प्रत्येक वादामध्ये पैगंबर आणि येशू यांना खेचत नाही ! – मुख्यमंत्री सरमा

मुख्यमंत्री सरमा

बोरा यांच्या विधानावर मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले की, लव्ह जिहादशी भगवान श्रीकृष्णाला जोडणे अत्यंत दुर्दैवी आहे. या विधानामुळे सनातनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. जर कुणी याविषयी तक्रार केली, तर मी कारवाई करण्यापासून कसा रोखू शकतो ?

जर गुन्हा नोंदवण्यात आला, तर अटक होऊ शकते. आम्ही प्रत्येक वादामध्ये महंमद पैगंबर आणि येशू यांना मध्ये खेचत नाही. जर काँग्रेस अशाच प्रकारची विधाने करू लागली, तर त्यांचा पत्ता एखादी मशीद किंवा मदरसा असू शकेल.

संपादकीय भूमिका 

  • काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !
  • लव्ह जिहादला पाठीशी घालणार्‍या काँग्रेसवाल्यांना मत देणारे हिंदू याविषयी विचार करतील का ?