कोल्हापूर – विश्व हिंदु परिषद, बजरंग दल यांची प्रांत स्तरावरील बैठक नुकतीच पिंपरी-चिंचवड येथे पार पडली. या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या विविध पदांवरील नियुक्त्या करण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हा बजरंगदल संयोजकपदी श्री. पराग फडणीस, कोल्हापूर शहर बजरंग दल संयोजकपदी श्री. अक्षय ओतारी, कोल्हापूर जिल्हा विश्व हिंदु परिषद सहमंत्री श्री. अनिल डांगे, विश्व हिंदु परिषद उपाध्यक्षपदी सौ. श्वेता कुलकर्णी, मातृशक्ती जिल्हा संयोजिका सौ. अश्विनी ढेरे, मातृशक्ती शहर संयोजिका मिरा हणमसागर, शहर दुर्गावाहिनी संयोजिका सौ. श्रद्धा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदाधिकार्यांनी करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगी जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, प्रथमेश मोरे, तसेच अन्य उपस्थित होते.