‘जानेवारी २०२१ मध्ये मला आध्यात्मिक त्रास होण्यास आरंभ झाला. त्यावर संतांनी मला आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगितले. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मी सांगितलेले उपाय पूर्ण केल्यावर माझ्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून झाले.
फेब्रुवारी २०२१ मध्ये वाराणसी आश्रमात पू. नीलेशदादा (पू. नीलेश सिंगबाळ) आणि आम्हा सर्व साधकांना भेटण्यासाठी पू. खेमकाकाका (पू. प्रदीप खेमका) आले होते. ते गेल्यानंतर मी एका सेवेसंबंधी पू. नीलेशदादांकडे गेले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही तुमचा चेहरा आरशात पाहिला आहे का ? तुमच्या चेहर्यात चांगला पालट दिसून येत आहे. तुमचा त्रास न्यून होऊन आनंदाचे प्रमाण वाढले आहे.’’ हे ऐकून माझे मन कृतज्ञताभावाने भरून आले.
त्या वेळी मला वाटले, ‘मी तर विशेष काहीच प्रयत्न केले नाहीत, तरी माझ्यात पालट कसे झाले ?’ तेव्हा ईश्वरानेच उत्तर दिले, ‘२ संत आणि ६१ टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असलेले ९ साधक यांच्या सान्निध्यामुळे हे घडले.’ त्या वेळी माझे मन अतिशय आनंदी झाले आणि माझ्याकडून परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
(मला संत आणि उन्नत साधक यांचा सत्संग मिळत आहे. त्यामुळे ‘मी पुष्कळ भाग्यवंत आहे’, असे मला अनुभवायला मिळत आहे. एकदा परात्पर गुरुदेवांनी मला सांगितले होते, ‘‘तुम्ही अत्यंत भाग्यवंत आहात !’’ हो गुरुदेव, ज्यांचे भाग्य आपण आपल्या श्री हस्तांनी लिहिलेले आहे, ते तर भाग्यवंतच असणार ना !)
‘परात्पर गुरुदेवा, माझ्यासारख्या तुच्छ जिवावर आपली प्रीती आहे. आपण मला जीवनात फुलासारखे अलगद आपल्या हातात उचलून धरले आहे. यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ते अल्पच आहे. ‘माझे हे जीवन आपल्या चरणांच्या अखंड सेवेसाठी समर्पित होण्यासाठी आपणच कृपा करावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. सानिका संजय सिंह, वाराणसी आश्रम (१६.२.२०२१)
|