त्रासदायक अर्थ असणार्‍या आडनावांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने अशी आडनावे पालटा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘काही जणांची आडनावे ‘गळाकाटू, ढेकणे, म्हैसधुणे, चिकटे, चकणे, चोर, चोरटे, रगतचाटे, चोरमुले, चोरे, बहिरे, दहातोंडे, पायमोडे, डोईफोडे, मानकापे, तांगतोडे’, अशी असतात. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या सिद्धांताप्रमाणे वरील आडनावे उच्चारल्यावर त्या आडनावांच्या अर्थाप्रमाणे त्यांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीने किंवा अन्य व्यक्तीने ते आडनाव उच्चारल्यावर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. व्यक्तीचे आडनाव दिवसभरातून अनेक वेळा उच्चारले जाते. त्याचा परिणाम ते आडनाव सांगणार्‍यावर आणि आजूबाजूच्या वातावरणावरही होतो. त्यामुळे शक्यतो अशी त्रासदायक आडनावे पालटून ज्या आडनावांमुळे त्रास होणार नाही, अशी आडनावे ठेवा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले