भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना सशर्त जामीन संमत

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह

नवी देहली – येथील राऊज एवेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह अन् महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांना सशर्त जामीन संमत केला. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या संदर्भात सिंह यांनी न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली होती. न्यायालयाने सिंह यांना विनाअनुमती विदेशात जाण्यास मनाई केली आहे. सिंह यांना दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाने अंतरिम जामीन दिला होता.