सातारा, ९ जुलै (वार्ता.) – फलटण तालुक्यातील सोनवडी येथील कोळसा भट्टीवर काम करणार्या एका आदिवासी विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे. १९ जून या दिवशी पीडित महिलेच्या मुलांना आणि पतीला एका खोलीत डांबून ठेवून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला. कोळसा भट्टीमालक हसन रफिक शेख आणि त्याच्या ४ सहकार्यांनी हे दुष्कृत्य केले आहे.
या प्रकरणी ७ जुलै या दिवशी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पीडित २६ वर्षीय महिला कातकरी समाजातील असून कुटुंबासह फलटण-शिंगणापूर रस्त्यावरील सोनवडी बुद्रुक गावच्या सीमेतील एका कोळसा भट्टीवर कामाला होती. हसन शेख आणि ४ जणांनी १९ जूनच्या रात्री पीडितेशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच याविषयी कुणाला काही सांगितल्यास तुला, पतीला आणि मुलांना जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून प्रकरणाची गंभीर नोंद !
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली असून दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी आवश्यक कलमे लावण्यात यावीत, तसेच लवकरात लवकर आरोपपत्र प्रविष्ट करण्यात यावे. पीडित महिलेला मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत साहाय्य करण्यात यावे, अशी मागणी डॉ. गोर्हे यांनी केली आहे. |
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कोळसा भट्टीचे मालक हसन रफिक शेख यास अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. |
संपादकीय भूमिका :धर्मांधांची महिलांवरील वाढती अत्याचाराची प्रकरणे संतापजनक आहेत. धर्मांधांना महिलांवरील अत्याचारासाठी फाशीची शिक्षा करण्याचाच कायदा करायला हवा ! |