गुरुस्तवन पुष्पांजली
गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !
६. जड आणि कठोर मेरु पर्वत अन् अत्यंत कोमल अंतःकरणाचे सद़्गुरु !
‘उपमे द्यावा जरी मेरु ।
तरी तो जड पाषाण कठोरु ।|
तैसा नव्हे कीं सद़्गुरु ।
कोमळ दिनाचा ॥ – दासबोध, दशक १, समास ४, ओवी १८
अर्थ : सद़्गुरूंना मेरु पर्वताची उपमा द्यावी, तर मेरु पर्वत जड पाषाणाचा आणि कठोर असतो. सद़्गुरु तर दीन अन् शरणागत जिवांसाठी अत्यंत कोमल अंतःकरणाचे असतात. त्यामुळे त्यांना पर्वताची उपमाही देता येत नाही.’
६ अ. प्रत्येक प्राणीमात्राच्या उन्नतीसाठी तळमळणारे आणि अहोरात्र विश्वव्यापक कार्य करणारे कोमलहृदयी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव !
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सामाजिक, राष्ट्रीय, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा सर्वच स्तरांवरील स्थूल अन् सूक्ष्म कार्याचा विचार केला, तर त्यापुढे मेरु पर्वतही ठेंगणाच वाटेल ! याचे कारण गुरुदेवांचे कार्य गगनालाही भिडणारे आहे. संपूर्ण प्राणीमात्रांवर असलेली निरपेक्ष प्रीती आणि समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे, ही तळमळ यांमुळे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी हे विश्वव्यापक कार्य आरंभले आहे. त्यांच्या विशाल आणि कोमल अंतःकरणात दीन जनांप्रती अत्यंत कळवळा असल्याने विश्वकल्याणाचे त्यांचे कार्य अविरत चालू आहे.
गुरुदेवांचे अथक कार्य आणि त्यांची संकल्पशक्ती यांमुळे आज राष्ट्र अन् धर्म पुनरूत्थानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी आपण राष्ट्रगुरु अन् धर्मगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची शरणागतभावाने आळवणी करूया !’
(क्रमश:)
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२९.६.२०२३)