देश-विदेशातील वैज्ञानिक संस्थांचे संशोधन
लेह (लडाख) – रामायण काळात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालय पर्वतातून आणलेली संजीवनी म्हणजे ‘सीबकथॉर्न’ वनस्पती ही बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणारी एक आश्चर्यकारक वनस्पती आहे, असे देश-विदेशातील जंगली झाडे आणि वनस्पती यांवर संशोधन करणार्या ५० संशोधकांच्या वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ‘सीबकथॉर्न’ औषधी वनस्पतीमध्ये ऑक्सिजनपासून शरिराच्या ७ गरजा पूर्ण करण्याची क्षमता असल्याचेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ‘सीबकथॉर्न’चे काटेरी झुडूप भारतातील लाहौल, स्पिती, चांगथांग, सिंधू, द्रुवा, दारस, सुरू आणि झांस्कर यांसारख्या हिमालयीन नद्यांच्या काठावर मुबलक प्रमाणात वाढते.
Scientists say Himalayan herb is modern-day sanjeevani – http://t.co/mglKMWXKYT pic.twitter.com/zCu9An8YSs
— The Hindu (@the_hindu) August 25, 2014
१. ‘सीबकथॉर्न’ वनस्पतीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार त्याची फळे, पाने, डहाळ्या आणि मुळे हेही शरिरासाठी लाभदायक आहेत. यापासून बनवलेले रासायनिक पेय हे उणे ४० अंश तापमानात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या नियमित आहाराचा भाग आहे.
२. रशियाने त्याच्या अंतराळविरांना केवळ ‘सीबकथॉर्न’पासून बनवलेले पेय दिले, ज्यामध्ये अंतराळ किरणोत्सर्गाचा सामना करण्याची क्षमता आहे.
३. कजरी, दिहार, सोवारीग्पा यांसारख्या लेहमध्ये कार्यरत असलेल्या देशातील अनेक वैज्ञानिक संस्थांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, ‘सीबकथॉर्न’मध्ये संजीवनीमध्ये दर्शवलेले सर्व औषधी गुणधर्म आहेत. या संदर्भातील अभ्यास अहवाल ‘वर्ल्ड रिसर्च जर्नल’मध्ये प्रसिद्ध होणार आहे.
४. चीन, भूतान, रशिया यांसारख्या देशांनी या वनस्पतीवर संशोधन करण्यास चालू केले आहे; मात्र भारत यात मागे आहे. आजही लडाख, काश्मीर आणि भूतान येथे या वनस्पतीचा ६० टक्के वापर होत नाही. आता पर्यावरण, वन आणि हवामान पालट मंत्रालयाने ‘ग्रीन इंडिया मिशन’मध्ये या वनौषधीच्या मोठ्या प्रमाणावर लागवडीची योजना आखली आहे. आयुष मंत्रालयाच्या मान्यतेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.