दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

गुरुस्तवन पुष्पांजली

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

२. परीस आणि सद़्‍गुरु

‘सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ – दासबोध, दशक १, समास ४, ओवी १२

अर्थ : परीसस्‍पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की, ते परत कधीच लोखंड होत नाही. त्‍याप्रमाणे गुरूंनी आपल्‍या दासाचे अज्ञान एकदा का समूळ नष्‍ट केले की, तो परत कधीही संशयात पडत नाही.’

२ अ. साधकांचे जीवन निसंदेह, पवित्र आणि साधनामय करणारा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा परीसस्‍पर्श !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या ज्ञानरूपी पवित्र परिसाच्‍या स्‍पर्शाने साधकांच्‍या जीवनाचे सोने झाले असून त्‍यांच्‍यात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. गुरुदेवांनी साधकांना दिव्‍य साधना सांगून त्‍यांच्‍यावर साधनेचा दृढ संस्‍कार केला आहे. त्‍यांनी साधकांना एवढे परिपूर्ण ज्ञान दिले आहे की, साधकांच्‍या मनात आता कोणताच संदेह राहिलेला नाही आणि त्‍यांच्‍या बुद्धीला कोणते प्रश्‍नही पडत नाहीत.

श्री गुरूंनी सांगितलेल्‍या मोक्षदायी गुरुकृपायोग साधनेतील एकेक प्रयत्न निःशंकतेने आणि श्रद्धेने करून स्‍वतःत आंतरिक परिवर्तन होत असल्‍याची अनुभूती घेऊया !’

(क्रमश:)

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२५.६.२०२३)