परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मदिनानिमित्त आयोजित केलेल्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’त साधकांच्‍या भावाच्‍या ‘बिंबा’चे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा भाव जागृत होऊन ‘प्रतिबिंब’ उमटणे आणि त्‍यातून गुरु – शिष्‍य यांचे आध्‍यात्मिक नाते अनुभवयास मिळणे

३ जुलै २०२३ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्‍या निमित्ताने…

श्री. राम होनप

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. या दिवशी त्‍यांची रथातून फेरी काढण्‍यात आली. याद्वारे अनेक जिल्‍ह्यांतील साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले. या प्रसंगी गुरु-शिष्‍य यांचे आध्‍यात्मिक नाते सर्व साधक अनुभवत होते. त्‍या वेळी ‘जीवनातील हे अमूल्‍य क्षण कधीच संपू नयेत’, असे सर्व साधकांना वाटत होते.

दर्शन घेतांना सहस्रो साधक भावविभोर झाले होते. बहुतेक साधकांना भावामुळे अश्रू अनावर झाले. साधकांचा त्‍यातून गुरूंविषयी असलेले ‘आर्तभाव’, ‘कृतज्ञताभाव’ आणि ‘शरणागतभाव’ व्‍यक्‍त होत होते. साधकांच्‍या चेहर्‍यांवर गुरूंच्‍या दर्शनातून ‘सर्वकाही मिळाले’, असा कृतार्थभाव दिसून येत होता. हे साधकांचे अंतरंगातील ‘बिंब’ परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर पडले आणि त्‍याचे ‘प्रतिबिंब’ म्‍हणून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचाही त्‍या वेळी भाव जागृत झाला; कारण देव भावाचा भुकेला असतो. त्‍याला साधकाकडून भावाव्‍यतिरिक्‍त अन्‍य काही नको असते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक