मुंबईत महामार्गावर घोड्यांची शर्यत लावणार्‍या चौघांना अटक !

घोडागाडी चालवणारे तरुण

मुंबई – येथील पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर काही तरुणांनी घोड्यांची शर्यत लावली होती. दोन तरुण घोडागाडीत बसून ती वेगाने पळवत होते. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ४ जणांना अटक केली आहे. इतर वाहनेही या महामार्गावरून धावत होती. या वेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. अन्‍यथा मोठा अनर्थ ओढवला असता.