७ जुलैपर्यंत दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिर २४ घंटे खुले रहाणार !

श्री विठ्ठल मंदिर, पंढरपूर

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर) – आषाढी यात्रेसाठी येणार्‍या अधिकाधिक भाविकांना श्री विठ्ठलाचे पदस्‍पर्श दर्शन आणि मुख दर्शन घेता यावे यासाठी २० जूनपासून २४ घंटे दर्शन व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार श्री विठ्ठल आणि रुक्‍मिणी यांचा शेजघरातील पलंग काढून ठेवण्‍यात येतो. आषाढी आणि कार्तिकी वारीमध्‍ये राज्‍यभरातून लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. आलेल्‍या अधिकाधिक भाविकांना दर्शनाला लाभ व्‍हावा यासाठी श्री विठ्ठल मंदिर २४ घंटे खुले ठेवण्‍याची परंपरा आहे.

देवाचे स्नान, नित्‍य पूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्‍याकाळी लिंबूपाणी आदी उपचारांपुरते दर्शन बंद रहाणार आहे. उरलेल्‍या सर्व वेळेत दिवसरात्र भाविकांना दर्शन घेता येणार आहे.