रामनाथी, २१ जून (वार्ता.) – श्रीकृष्ण जन्मभूमीच्या खटल्यात अधिवक्ता म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मथुरा येथे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा खटला लढवत आहे. त्या वेळी विरोधी पक्षाकडून ४ वरिष्ठ अधिवक्ता होते; मात्र मला न घाबरता हिंदूंची भूमिका मांडता आली.
या प्रसंगात भगवंताचा आशीर्वाद समवेत असल्याचे जाणवत होते. या खटल्याचा निर्णय हिंदूंच्या बाजूने लागला. देहली येथे हिंदुत्वासाठी कार्य करण्यासाठी अधिवक्ते पुढे येत आहेत, ही भगवंताचीच लीला आहे. ईश्वरच सर्व करतो आणि आपल्याला आनंद देतो,असे भावपूर्ण उद्गार हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली येथील सदस्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी काढले. त्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.