वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव आणि गुरुपौर्णिमा यांच्‍याशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी होऊ शकणार्‍या विविध प्रकारच्‍या त्रासांवर करायचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय !

‘साधकांनी प्राणशक्‍तीवहन पद्धतीनुसार शोधलेला नामजप किंवा ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या पुढील साधकांनी किंवा संतांनी सांगितलेला उपायांचा नामजप करूनही त्‍यांचे त्रास न्‍यून होत नसल्‍यास ते खाली सांगितल्‍याप्रमाणे आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करू शकतात.

१. मनातील नकारात्‍मक विचार आणि सेवेतील अडथळे दूर होण्‍यासाठी करायचे उपाय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव आणि गुरुपौर्णिमा यांच्‍याशी संबंधित सेवा करतांना ‘मनामध्‍ये नकारात्‍मक विचारांचे प्रमाण वाढणे, सेवेच्‍या संदर्भात उदासीनता जाणवणे किंवा सेवेत अडथळे येणे’, असे काही त्रास काही साधकांना होत आहेत किंवा पुढे होणार आहेत. अशा साधकांनी मनातील नकारात्‍मक विचार आणि सेवेतील अडथळे एका कागदावर लिहून ते कापराने जाळून टाकावेत. तसेच स्‍वत:भोवतीचे आवरण दोन्‍ही हातांनी किंवा न पेटलेल्‍या उदबत्तीने प्रत्‍यक्ष किंवा मानसरित्‍या काढावे.

२. स्‍वत:भोवती संरक्षककवच निर्माण होण्‍यासाठी करायचे उपाय

साधकांच्‍या भोवती देवाचे संरक्षककवच निर्माण होण्‍यासाठी दिवसातील अधिकाधिक वेळा मनोमन प्रार्थना करावी. तसेच ही प्रार्थना लिहून तिच्‍याभोवती भगवान श्रीकृष्‍णाच्‍या नामजपाचे मंडल लिहून तो कागद सच्‍चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्‍या जीवनदर्शन ग्रंथात किंवा सनातनच्‍या एखाद्या ग्रंथात किंवा दैनिक/साप्‍ताहिक/मासिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये ठेवावा. तसेच स्‍वत:चे एखादे छायाचित्र सच्‍चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्‍या जीवनदर्शन ग्रंथात किंवा सनातनच्‍या एखाद्या ग्रंथात किंवा दैनिक/साप्‍ताहिक/मासिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये ठेवावे. तेही शक्‍य नसल्‍यास एखाद्या रिकाम्‍या खोक्‍यात घालून ठेवावे. त्‍याचप्रमाणे स्‍वत:चे रक्षण होण्‍यासाठी लाल दोर्‍यामध्‍ये सनातनच्‍या एखाद्या देवतेचे सात्त्विक चित्र असणारे एक पदक (लॉकेट) घालून ते पदक गळ्‍यात धारण करावे. तसेच या पदकाची प्रतिदिन शुद्धी करण्‍यासाठी त्‍याला सूर्यप्रकाश दाखवणे किंवा पेटलेल्‍या उदबत्तीने ओवाळणे किंवा त्‍याला विभूती लावून पुन्‍हा ते पदक गळ्‍यात धारण करणे’, असे उपाय साधक करू शकतात.

३. प्रवासात त्रास होऊ नयेत, यासाठी करायचे उपाय

वाहनाची गोमूत्र किंवा विभूती मिश्रित जलाने शुद्धी करावी. वाहनाच्‍या समोरच्‍या आणि मागील बाजूस तसेच आतील बाजूला देवतांच्‍या नामजपाच्‍या पट्ट्या लावाव्‍यात. त्‍याचप्रमाणे वाहनात सतत प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने हळू आवाजात लावून ठेवावीत. त्‍याचप्रमाणे प्रवासाला निघण्‍यापूर्वी ‘वाहनाभोवती दैवी शक्‍तीचे संरक्षककवच निर्माण होऊ दे आणि संपूर्ण प्रवास निर्विघ्‍नपणे होऊ दे’, अशी देवाला प्रार्थना लिहून त्‍या प्रार्थनेच्‍या भोवती भगवान श्रीकृष्‍ण किंवा हनुमान यांच्‍या नामजपाचे मंडल लिहून तो कागद सच्‍चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्‍या जीवनदर्शन ग्रंथात किंवा सनातनच्‍या एखाद्या ग्रंथात किंवा दैनिक/ साप्‍ताहिक/ मासिक सनातन प्रभातमध्‍ये किंवा रिकाम्‍या खोक्‍यात ठेवावा.

४. ‘रात्री झोपल्‍यावर त्रास होऊ नये’, यासाठी करायचे उपाय

अंथरुणाच्‍या खाली दैनिक/साप्‍ताहिक/मासिक ‘सनातन प्रभात’चे अंक किंवा देवतांच्‍या नामपट्ट्यांचे मंडल घालावे. तसेच डोक्‍याभोवती आणि पायाच्‍या समोर रिकामे खोके ठेवावे आणि खोलीत रात्रभर प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने हळू आवाजात लावून ठेवावीत.

५. अन्‍य उपाय करणे

वरील उपाय करूनही त्रास न्‍यून होत नसतील, तर पायांमध्‍ये लाल दोरा बांधणे, अंघोळीच्‍या पाण्‍यात विभूती किंवा कापराची पूड किंवा गोमूत्र घालून स्नान करावे. तसेच कपडे धुतांना पाण्‍यामध्‍ये विभूती किंवा कापराची पूड किंवा गोमूत्र घालून धुवावेत. ‘स्‍वत:ची पेटलेल्‍या कापराने किंवा नारळाने किंवा तुरटीने प्रत्‍यक्ष किंवा मानसदृष्‍ट्या दृष्‍ट काढणे’, असे उपाय करू शकतो.

६. विविध प्रकारच्‍या आध्‍यात्मिक उपायांचे महत्त्व !

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२३)