|
न्यूयॉर्क (अमेरिका) – नैराश्यावर मात करण्यासाठी लोक औषधे घेतात. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढले आहे. असे असले, तरी यासंदर्भात केलेल्या संशोधनामध्ये प्रत्येक १ सहस्त्र भारतियांमध्ये केवळ ९ जणांनाच मानसिक तणावावर औषधोपचार करावा लागतो. ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात ९, लॅटव्हिया २१, रशिया २३, तर दक्षिण कोरियात प्रत्येक १ सहस्त्र नागरिकांमागे २७ जणांना औषधे घ्यावी लागतात. विकसित देशांपैकी युनायटेड किंगडम १०८, अमेरिका ११०, ऑस्ट्रेलिया १२२ आणि कॅनडा येथे प्रत्येक १ सहस्त्र कॅनडियन नागरिकांमागे तब्बल १३० जणांना नैराश्यावर मात करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या संशोधनाच्या आकडेवारीनुसार जगात भारतात मानसिक त्रासांचे प्रमाण सर्वांत अल्प आहे.
संपादकीय भूमिकाभारतात आजही धर्माचरणाचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. याउलट पाश्चात्त्य देशांत चंगळवाद फोफावला असल्याने तेथील लोकांना नैराश्याला सामोरे जावे लागते. यातून साधना आणि अध्यात्म यांची कास धरणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते ! |