१. कार्यशाळेत वर्षभराचे समष्टी साधनेचे नियोजन ऐकतांना वातानुकूलित यंत्र चालू असूनही सभागृहात उष्णता जाणवणे
‘साधनाविषयक कार्यशाळेत वर्षभराचे समष्टी साधनेचे नियोजन कृतज्ञताभाव ठेवून ऐकायला सांगण्यात आले आणि भावजागृतीचा प्रयोग घेण्यात आला. तेव्हा मला प्रथम धर्मध्वज दिसला. ‘हिंदु राष्ट्रा’ची शपथ घेतांना सगळीकडे भगवे झेंडे फडकत आहेत’, असे मला दिसले. वातानुकूलित यंत्र चालू असूनही सभागृहात पुष्कळ उष्णता जाणवली. त्या वेळी मला घाम आला.
२. नियोजन ऐकतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे
वर्षभरातील उपक्रमांचे नियोजन ऐकतांना रथोत्सवामधील गुरुमाऊलींचे (वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.) दर्शन झाले.
३. मंदिर स्वच्छता उपक्रमाविषयी ऐकतांना सगळे वातावरण शीतल होऊन साधिकेचा नामजप चालू होणे
मंदिर स्वच्छता उपक्रमाविषयी ऐकतांना सगळे वातावरण शीतल झाले. ‘जय गुरुदेव । जय गुरुदेव ।’, असा माझा नामजप चालू झाला. उपक्रमांचे नियोजन सूक्ष्मातून झालेलेच आहे. मला त्यांत सहभागी होण्याची संधी दिली, यासाठी मला कृतज्ञता वाटत होती.
त्या वेळी ‘गुरुदेवांना जशी अपेक्षित आहे, तशी सेवा आणि साधना आम्हा सर्व साधकांकडून होऊ दे’, अशी प्रार्थना झाली. कृतज्ञता !’
– सौ. स्नेहल विलास गुरव, मुंबई. (२१.६.२०२२)
|