१. १७.३.२०२३ या दिवशी झालेल्या यागाच्या वेळी जाणवलेली सूत्रे
अ. ‘याग चालू असतांना माझे सहस्रारचक्र आणि आज्ञाचक्र यांवर शक्ती अन् चैतन्य यांची स्पंदने जाणवत होती.
आ. माझे ध्यान लागत होते.
इ. ‘अग्नीच्या ज्वाळा माझ्याशी काहीतरी बोलत आहेत’, असे मला जाणवले.
ई. श्री दक्षिणामूर्तीच्या चित्रातील त्यांच्या चरणांकडे पाहिल्यावर मला काही प्रमाणात देवीची स्पंदने जाणवत होती. त्यांच्या चरणांकडे पाहून माझी नृत्य करण्याची इच्छा जागृत झाली.
उ. श्री दक्षिणामूर्तीचे रूप पुष्कळ सुंदर दिसत होते. ‘त्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.
ऊ. श्री दक्षिणामूर्तीकडे पाहिल्यावर मला ज्ञानयोगी शिवाचे रूप दिसले.
२. १७.३.२०२३ या दिवशी संध्याकाळी ८ ते १०.३० या कालावधीत यागाच्या वेळी सुचलेल्या चित्राचे विश्लेषण
मंत्र
ॐ नमो भगवते दक्षिणामूर्तये । मह्यं मेधां प्रज्ञां प्रयच्छ स्वाहा ॥
अर्थ : हे भगवान श्री दक्षिणामूर्ति, मला बुद्धी संपादन आणि धारण करण्याची शक्ती प्रदान करा.
अ. शिवलिंगावरील भस्माच्या पट्ट्यांवर शिवाचे आज्ञाचक्र आहे. त्यामधून ज्ञान येत आहे आणि ऊर्जा प्रक्षेपित होत आहे.
आ. भस्माच्या ३ पट्ट्या शांतीची स्पंदने दर्शवत आहेत.
इ. ‘अग्नि माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले.
ई. शिवलिंगाकडे पाहून मला ज्योतिर्लिंगांचे स्मरण झाले.
उ. या चित्राकडे पाहून मला शिव आणि कृष्ण या देवतांचे स्मरण झाले.
३. सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी हे चित्र पाहून सांगितले, ‘‘अग्नीच्या ज्वाळांमध्ये शिव दिसला; म्हणून असे चित्र काढले आहे.’’ (८.४.२०२३)
– कु. म्रिणालिनी देवघरे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
|