त्र्यंबकेश्‍वर मंदिरासह ५ देवस्‍थानांच्‍या अध्‍यक्षपदी येथील अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधिशांच्‍या नियुक्‍त्‍या !

जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.डी. जगमलानी यांचे आदेश !

प्रतिकात्मक चित्र

नाशिक – जिल्‍ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिरासह ५ देवस्‍थानांच्‍या  म्‍हणजे सप्‍तशृंगगड, काळाराम मंदिर, रामदासस्‍वामी मठ आणि पंचवटी येथील व्‍यंकटेश बालाजी मंदिर यांच्‍या अध्‍यक्षपदी येथील अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधिशांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत. प्रधान जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश एस्.डी. जगमलानी यांनी हे आदेश काढले आहेत.

उन्‍हाळी सुट्ट्या संपल्‍यानंतर नाशिक येथील अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधिशांच्‍या नियुक्‍त्‍या संदर्भात आदेश निर्गमित केले. त्‍यानुसार त्र्यंबकेश्‍वर देवस्‍थानच्‍या अध्‍यक्षपदी न्‍यायाधीश एन्.व्‍ही. जीवने, सप्‍तशृंगी देवी मंदिर अध्‍यक्षपदी न्‍यायाधीश बी.व्‍ही. वाघ, काळाराम मंदिर अध्‍यक्षपदी न्‍यायाधीश एम्.आय. लोकवाणी, रामदासस्‍वामी मठ अध्‍यक्षपदी न्‍यायाधीश जे.एम्. दळवी आणि पंचवटीतील व्‍यंकटेश बालाजी मंदिर अध्‍यक्षपदी न्‍यायाधीश जी.पी. बावस्‍कर यांची नियुक्‍ती केली आहे.