उत्तराखंडमध्ये मुसलमानांनांनी आयोजित केली आहे महापंचायत !

‘लव्ह जिहाद’चा विरोध म्हणून मुसलमान दुकानदारांना दुकाने खाली करण्याच्या धमकीचे प्रकरण

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या उत्तरकाशी शहरातील पुरोला भागात लव्ह जिहादवरून मुसलमान दुकानदारांना १५ जूनपर्यंत दुकाने रिकामी करून निघून जाण्याची भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. त्यानंतर अनेक मुसलमान दुकानदार दुकाने बंद करून जाऊ लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांनी राजधानी डेहराडूनमध्ये १८ जून या दिवशी महापंचायतीचे आयोजन केले आहे.

उत्तरकाशीचे उपअधीक्षक सुरेंद्रसिंह भंडारी यांनी मुसलमान दुकानदार दुकाने बंद करून जात असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. ‘जर कुणी दुकाने बंद करून गेले असतील, तर ते वैयक्तिक कारणांमुळे गेले असतील’, असे त्यांनी म्हटले आहे. दुकानदारांना दुकाने रिकामी करण्याची धमकी दिल्याचे स्थानिक हिंदूंना नाकारले आहे. ‘मुसलमान स्वतःहून दुकाने रिकामी करून जात आहेत’, असेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान जेव्हा हिंदूंना पलायनास भाग पाडतात, तेव्हा अन्य हिंदू हे पीडित हिंदूंच्या साहाय्यासाठी कधीही अशा प्रकारे संघटित होत नाहीत; मात्र मुसलमान त्यांच्या धर्मबांधवांसाठी लगेच संघटित होतात, हे हिंदू कधी शिकणार ?