‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीवर सुबुही खान यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याचा परिणाम !
नवी देहली – आगामी हिंदी चित्रपट ‘७२ हुरे’ यावर ‘न्यूज १८’ या हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. (७२ हुरे ही इस्लामी संकल्पना असून त्यानुसार इस्लामचे काटेकोर पालन करणारे स्वर्गात गेल्यावर त्यांना ७२ सुंदर युवतींचा सहवास लाभतो.) यात सहभागी असणारे ‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांनी चर्चेत सहभागी ‘राष्ट्रीय जागरण अभियान’च्या संयोजक सुबुही खान यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे सुबुही खान यांनी जमाई यांना जाब विचारत चोपण्याचा प्रयत्न केला. या वेळी सूत्रसंचालक अमन चोपडा यांनी ही घटना रोखण्याचा प्रयत्न केला. सुबुही खान यांनी शोएब जमाई यांना फटकारत म्हटले की, येथून निघून जा. तुला आणि तुझ्या वडिलांनाही चोपेन.
सौजन्य मुरताजा स्टोरीज
१. सुबुही खान यांनी सांगितले की, शेकडो वर्षांपासून मुसलमान मुलींवर अत्याचार होत आहेत. आम्हाला दुःख होत आहे. ज्या दिवशी मुसलमान मुले पुनर्जन्मावर विश्वास ठेवू लागतील, तेव्हा ते घाबरणे थांबतील. त्यांना कर्माचा सिद्धांत लक्षात येईल.
२. शोएब जमाई यांच्या विरोधात देहली पोलिसांत अधिवक्ता शशांक शेखर झा यांनी तक्रार नोंदवली आहे. शोएब जमाई यांनी ‘हुरां’ची तुलना हिंदु धर्मातील अप्सरांशी केली होती. त्यावरून भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी घोषित केले आहे की, ज्या चर्चासत्रामध्ये शोएब जमाई सहभागी असतील, त्या चर्चासत्रामध्ये मी सहभागी होणार नाही.