इस्‍लाम सोडणार्‍या मुसलमानांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

१६ ते २२ जून २०२३ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होत असलेल्‍या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

गेल्‍या १० वर्षांपासून हिंदूंकडून दबाव निर्माण केला जाणे हे धर्मरक्षणासाठी स्‍तुत्‍यच होय !

‘सध्‍या इस्‍लाम सोडायची इच्‍छा असणारे समाजात अनेक लोक आहेत. त्‍यांना आपण साहाय्‍य करण्‍याची आवश्‍यकता आहे. पूर्वी हिंदु असणारे; पण नंतर धर्मांतर केलेले अनेक मुसलमान या देशात पहायला मिळतात. पूर्वी ते थोडे दबलेले असायचे; पण आज आपल्‍याला त्‍यांचे स्‍वरूप पालटलेले दिसते. उदाहरणार्थ ‘ओल्‍मोसो फ्री जीन’चे नाव ‘अली महमूद सोडवाला’ होते. आज तो स्‍वतःला ‘नचिकेता’ म्‍हणवतो. जेव्‍हा आपण ‘घरवापसी’ची स्‍थिती आणि दिशा पाहू लागतो, तेव्‍हा आपल्‍याला हे लक्षात ठेवावे लागेल की, या मुसलमान समाजातील वर्गाने त्‍याचा विवेक सोडलेला नाही; कारण त्‍यांच्‍यात काही धंदेवाईक आहेत, जे इस्‍लामच्‍या नावावर त्‍यांचा धंदा चालवतात. सर्व समाज त्‍यांच्‍यासमोर शेळ्‍या-मेंढ्यांप्रमाणे राहिला, तर त्‍यांचा हा धंदा चालेल. दूरचित्रवाहिन्‍यांवर आपल्‍याला कोणत्‍या घोषणा पहायला मिळतात ? कसल्‍या गोष्‍टी दाखवल्‍या जातात ? त्‍यामुळे त्‍यांना शेळ्‍या-मेंढ्यांप्रमाणे वागवणे, या धंदेवाईकांना अतिशय शोभते. त्‍यांच्‍या कथानकासाठी (‘नॅरेटिव्‍ह’साठी) ही परिस्‍थिती अतिशय योग्‍य आहे.

श्री. नीरज अत्री

१. मुसलमान पंथियांतील सुधारणावादी लोकांच्‍या पाठीशी रहाणे आवश्‍यक ! 

त्‍यांच्‍यात दुसरा वर्गही आहे, जो स्‍वतःचा विचार करतो. त्‍याने अद्याप त्‍याची बुद्धी या लोकांकडे गहाण टाकलेली नाही. ज्‍यांच्‍यात माणुसकी आणि संवेदनशीलता उरली आहे, असा हा समाज आहे. नूपुर शर्माच्‍या संदर्भात त्‍याचे एक उदाहरण पहायला मिळाले. मुंबईचा अशफाक अन्‍सारी साद हा अगदी तरुण मुलगा नूपुर शर्माच्‍या बाजूने बोलला. तेव्‍हा स्‍वत:ला हिंदुत्‍वनिष्‍ठ म्‍हणणारे मोठमोठे नेते आणि संघटना यांनीही त्‍या मुलापासून स्‍वत:ला बाजूला ठेवले होते. मुसलमानबहुल भागात रहाणारा एक मुलगा त्‍याचे मत निर्भयपणे मांडतो, तेव्‍हा त्‍याच्‍या पाठीशी उभे रहाण्‍याचे सोडून हिंदुत्‍वनिष्‍ठ म्‍हणवणारा समाज शांत बसला. अपेक्षेप्रमाणे तो मुसलमाबहुल परिसर असल्‍याने धर्मांधांनी त्‍याला वेढले. त्‍याने त्‍याला बलपूर्वक काही शब्‍द म्‍हणायला लावले. त्‍यानंतर त्‍याला पोलीस येऊन घेऊन गेले. यावरून आपण कोणत्‍या समाजामध्‍ये वावरत आहोत, हे दिसून येते. सध्‍या अन्‍य पंथियांच्‍या शुद्धीकरणाची चर्चा करणारे यशाकडे वाटचाल करत आहेत. या अनुषंगाने आपल्‍याला यशाची काही उदाहरणे पहायला मिळत आहेत. ही चळवळ फार पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. नूपुर शर्मा हिला अत्‍यंत दुर्दैवी वागणूक मिळाली. तिच्‍या समर्थनार्थ काही व्‍यावसायिकांनी पुढे येण्‍याचा प्रयत्न केला; पण त्‍यांना दडपण्‍यात आले.

२. स्‍वामी दयानंद सरस्‍वती यांच्‍या ‘सत्‍यार्थ प्रकाश’ ग्रंथाच्‍या माध्‍यमातून समाजामध्‍ये जागृती

पारतंत्र्याच्‍या काळात स्‍वामी दयानंद सरस्‍वती यांनी ‘सत्‍यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला. तेव्‍हा ती क्रांतीच होती. तोपर्यंत आपले पूर्वज मध्‍यपूर्व आणि युरोप येथून आलेल्‍या परकियांशी लढत होते. यासाठी त्‍यांनी शस्‍त्रांचा वापर केला. प्रथमच स्‍वामी दयानंद सरस्‍वती यांनी यात धर्मग्रंथांचा वापर केला. अपकृत्‍य करण्‍यास भाग पाडणारी धर्मांधांची ही विचारसरणी समजून घेतली पाहिजे. ते हिंसाचार, व्‍याभिचार, महिलांशी गैरवर्तन करतात आणि हे करतांना त्‍यांना लाजही वाटत नाही. ही कोणत्‍या प्रकारची विचारसरणी आहे, जे त्‍यांना असे करण्‍यास बाध्‍य करते ? स्‍वामींनी आर्य समाजाची स्‍थापना केली आणि मग शुद्धीकरण, तसेच घरवापसी चालू झाली.

३. स्‍वामी दयानंद सरस्‍वती यांनी जागृत केलेल्‍या समाजाला मोहनदास गांधी यांनी केले निद्रिस्‍त ! 

पण त्‍यानंतर वर्ष १९१४-१५ मध्‍ये मोहनदास गांधी यांचे आगमन झाले. ते जागे झालेल्‍या समाजाला झोपवण्‍याचे काम करू लागले. यासाठी त्‍यांनी वापरलेले तंत्र अगदी सोपे होते. ‘प्रत्‍येक जण आपल्‍यासारखा असतो’, अशी एक संकल्‍पना आहे. त्‍याप्रमाणे सर्व माणसे आपल्‍यासारखीच आहेत, असे समजून आपण त्‍यांच्‍याशी वागण्‍याचा प्रयत्न करतो. त्‍यांनी ‘अहिंसा परमो धर्म:’ (अहिंसा हाच श्रेष्‍ठ धर्म आहे.) याचा प्रचार केला. गांधींनी माणसाच्‍या कमकुवतपणाचा चांगलाच उपयोग करून घेतला. त्‍यांनी आपल्‍या समाजाला ‘सर्वधर्मसमभाव’(सर्व धर्म समान आहेत), ‘धर्म एकमेकांशी शत्रुत्‍व शिकवत नाही’, ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम’, अशी काही वाक्‍ये दिली आहेत.

स्‍वामी दयानंद सरस्‍वती यांनी चालू केलेल्‍या प्रयत्नांच्‍या पूर्णपणे उलट प्रवृत्ती गांधींनी चालू केली. हे इंग्रजांनाही आवडणारे होते. एक सुस्‍त आणि भ्‍याड समाज, जो याचिका प्रविष्‍ट करू शकतो, जो केवळ समोर उभा राहू शकतो; पण तो कोणत्‍याही क्रूरच नाही, तर चांगल्‍या विचारसरणी असणार्‍या शासनकर्त्‍याला कधीही हादरवू शकत नाही. त्‍यामुळे आपल्‍या देशात ही नौटंकी (नाटक) चालू राहिली. धर्माविषयी बोलणार्‍याला ‘जातीयवादी’ असा शिक्‍का लावण्‍यात आला. त्‍यानंतर ‘संघी’ हा शब्‍द आला. त्‍यानंतर दुसरा शब्‍द ‘भक्‍त’ आला. हे तर शब्‍द तेच आहेत, जे एक प्रकारे ‘ओव्‍हरटन विंडो’ (एका विशिष्‍ट वेळी मुख्‍य प्रवाहातील लोकसंख्‍येला राजकीयदृष्‍ट्या स्‍वीकारार्ह असलेल्‍या धोरणांची श्रेणी) ठरवतात आणि हा संघर्ष अखंड चालू आहे.

४. सामाजिक माध्‍यमांमुळे इस्‍लाममधील विघातक वास्‍तविकता आणि सनातन धर्माचे सत्‍य बाहेर येणे

वर्ष २०१४ नंतर लोकांना वाटू लागले की, आता ते त्‍यांच्‍या धर्माची गोष्‍ट करू शकतात. केवळ राजकारण्‍यांमुळेच नाही, तर या काळात किंवा थोडे पूर्वी सामाजिक माध्‍यमेही प्रभावी होऊ लागली होती. सामाजिक माध्‍यमांनी आर्य, हिंदु आणि सामान्‍य सनातन धर्म यांना सक्षम बनवण्‍याचे काम केले. आतापर्यंत केवळ एकतर्फी ऐकावे लागत होते. त्‍याने ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम’ म्‍हटले, तर तुम्‍हाला आवडो किंवा न आवडो त्‍याला तुम्‍ही प्रत्‍युत्तर देऊ शकत नव्‍हते. हा सर्व खेळ सामाजिक माध्‍यमांनी पालटला. आता आपण प्रत्‍युत्तर देऊ शकतो आणि द्यायला प्रारंभही केला आहे. परिणामी ‘इस्‍लाम हा शांतीचा धर्म आहे’, असे सर्व ‘ओव्‍हरटन विंडो’मधून बाहेर पडू लागले आणि त्‍या ठिकाणी सनातन धर्माचे सत्‍य समाजासमोर येऊ लागले.

आता सामाजिक माध्‍यमांचीही १० वर्षे झाली आहेत. नूपुर शर्माच्‍या प्रकरणामुळे धर्मांध या संपूर्ण प्रक्रियेला मागे ढकलण्‍याचा प्रयत्न करत आहेत, ‘आम्‍ही गुंड आहोत, गुंडगिरी करू आणि तुमचे शासनकर्ते गुंडगिरीला घाबरतात; म्‍हणून तुम्‍हालाही आमची भीती बाळगावी लागेल.’ हे दुर्दैवाने घडत आहे. हा संघर्ष यासाठी दिसून येत आहे; कारण आपण मुल्ला-मौलवींचा (इस्‍लामच्‍या धार्मिक नेत्‍यांचा) जो संपर्क होता, तो जवळजवळ तोडला किंवा नष्‍ट केला. आता ते हातावर हात ठेवून बसणार नाहीत. त्‍यामुळे ते त्‍यांच्‍या बाजूने लढा देत आहेत.

५. इस्‍लामविषयीची भीती दूर करून सध्‍या हिंदूंकडून दबाव निर्माण केला जाणे

मी ज्‍या ‘नॅरेटिव्‍ह’विषयी सांगत आहे की, जे तुमच्‍या लक्षात येईल. बॉलीवूडमध्‍ये असे काही चित्रपट यायचे, ज्‍यात एखाद्या गुंडाचे साम्राज्‍य असायचे, उदाहरणार्थ ‘घातक’ चित्रपट होता. त्‍यात ‘आतंकवादामध्‍ये संपूर्ण आयुष्‍य गेले आणि तू एकदा येऊन भीती संपवली’, असे खलनायक म्‍हणायचा. याच भीतीवर आपल्‍या देशात इस्‍लामी कथानक चालू होते. या भीतीचा परिणाम असा झाला की, आपण आपल्‍या अगदी न्‍यायोचित मागण्‍या मान्‍य करण्‍यासाठी भीक मागायचो आणि ऐकायला कुणीच नसायचे. जरी ते राममंदिराचे प्रकरण असले तरी. आता लोक उठून खटले प्रविष्‍ट करत आहेत. ज्ञानवापी मंदिर आणि मथुरा ही त्‍याची उदाहरणे आहेत. गेल्‍या १० वर्षांपासून हिंदूंकडून एक प्रकारे दबाव निर्माण केला जात आहे. हे सातत्‍याने चालू राहिल्‍यास ‘घरवापसी’ चळवळीला आणखी गती येईल.

६. इस्‍लामच्‍या जाचक धोरणांच्‍या विरोधात उभे रहाणार्‍यांना पाठिंबा देण्‍याची आवश्‍यकता  !

प्रतिदिन लोक माझ्‍याशी संपर्क करतात आणि सांगतात, ‘त्‍यांचा (हिंदु धर्मात येऊ इच्‍छिणार्‍या मुसलमानांचा) जीव गुदमरतोय, त्‍यांना बाहेर पडायचे आहे; पण त्‍यांच्‍या काही समस्‍या आहेत. त्‍यामुळे ते त्‍यांचा पंथ सोडू शकत नाहीत.’ ‘घरवापसी’साठी विविध पातळ्‍यांवर काम केले जात आहे. काही काम राज्‍य आणि केंद्र सरकार, न्‍यायव्‍यवस्‍था यांनी केले पाहिजे. कायद्याचे राज्‍य निर्माण करणे आणि त्‍याची कार्यवाही करणे, हे त्‍यांचे दायित्‍व आहे. दुर्दैवाने ते अद्याप तितकेसे प्रभावी नाहीत. परिणामी ‘आम्‍ही तुम्‍हाला इस्‍लाम सोडू देणार नाही’, ‘ख्रिस्‍ती धर्म सोडू देणार नाही’, असे म्‍हणणारे धर्मांध गुंडही त्‍यात प्रभावी आहेत. प्रशासन कमकुवत असल्‍याने ते काम करत नाही. त्‍यामुळे आता वैयक्‍तिक किंवा संस्‍थात्‍मक पातळीवर हे काम चालू ठेवण्‍याची आवश्‍यकता आहे.

त्‍यांना दहशतीचा वापर करावा लागला; कारण त्‍यांना खोटे बोलायचे आहे. सरकारने पाठिंबा दिला किंवा न दिला, तरी हे काम फार अवघड काम नाही. आपल्‍याला केवळ दृढ विश्‍वास हवा आहे. ‘आपण धर्म आणि सत्‍य यांच्‍या मार्गावर चालत आहोत’, याची जाणीव ठेवली, तर त्‍यातून आपल्‍याला बळ मिळते. हे काम अखंडपणे करता येईल. त्‍याचे परिणाम आपण सर्वजण पहात आहोत. अनेक लोक इस्‍लामच्‍या जाचक धोरणांच्‍या विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. त्‍यांना पाठिंबा देण्‍याची आवश्‍यकता आहे.

७. जन्‍महिंदूंची ‘घरवापसी’ होणे आवश्‍यक !

‘ज्‍यांची नावे हिंदू आहेत; पण ज्‍यांच्‍यात हिंदुनिष्‍ठा नाही’, ही माणसे शत्रूच्‍या बाजूने उभी आहेत. अशा लोकांची ‘घरवापसी’ करणे आवश्‍यक आहे. मला एक अतिशय साधा आणि सोपा प्रश्‍न विचारावासा वाटतो, जेव्‍हा कुणी मला चुकीचा तर्क देतो, तेव्‍हा मी त्‍याला सांगतो की, संध्‍याकाळच्‍या आरतीच्‍या वेळी कोणत्‍याही मंदिरासमोर जाऊन उभे रहा आणि ते काय बोलतात, ते ऐका. तेथे ‘जगाचे कल्‍याण होवो’, ‘सर्व प्राणीमात्रांमध्‍ये सद़्‍भावना होवो’, असे ऐकायला मिळेल.

ते केवळ हिंदूंविषयी बोलत नाहीत, केवळ जातींविषयी बोलत नाहीत, केवळ मानवतेविषयीही बोलत नाहीत, तर प्राणीमात्रांविषयी बोलत आहेत. अशी उदार विचारसरणी कुठे सापडेल का ? आणि जेव्‍हा तो म्‍हणतो की, ‘जगाचे कल्‍याण व्‍हावे’, तेव्‍हा त्‍यात सर्व जण येतात. त्‍यानंतर तुम्‍ही मशिदीबाहेर जाऊन उभे रहा. त्‍याचीही आवश्‍यकता नाही. केवळ घरी बसून रहा. त्‍यांचा ध्‍वनीक्षेपक आपल्‍याला दिवसातून ५ वेळा ओरडून ओरडून सांगेल. ‘अल्लाखेरीज कुणाचीही उपासना करता येत नाही.’ त्‍यांचा प्रारंभच नकारात्‍मकतेतून आणि द्वेषाने होतो. आपल्‍याला आपला समाज, आपली मुले यांच्‍यासाठी कशा प्रकारचे भविष्‍य हवे आहे ? जो जगाच्‍या कल्‍याणाची इच्‍छा करतो, जो प्राणीमात्रांमध्‍ये सद़्‍भावना निर्माण होण्‍याची कामना करतो त्‍याची ? कि सकाळचा प्रारंभच द्वेषाने करणार्‍यांची ? उत्तर आपल्‍याकडेच सापडेल. ‘घरवापसी’चे हे कार्य अधिक वेगवान करण्‍याची आवश्‍यकता आहे. आपल्‍या कार्याची दिशा योग्‍य असून आपल्‍याला त्‍याच दिशेने पुढे जायचे आहे. त्‍यामुळे आपण आपली मुले आणि येणार्‍या पिढ्या यांना सुंदर भविष्‍य देऊन जाणार अन् हेच आपले दायित्‍व, कर्तव्‍य आणि आपला धर्म आहे.’

– श्री. नीरज अत्री, अध्‍यक्ष, विवेकानंद कार्य समिती,पंचकुला, हरियाणा.